छत्रपती संभाजीनगर (लोकनिष्ठ)
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या अजब कारभारावर आणि चेअरमनच्या भूमिकेवर प्रशचिन्ह निर्माण झाले असून वक्फ बोर्डच्या मनमानी कारभारावर वर्ष सुरु झाल्या पासून अनेक प्रकरणात घोटाळे, भ्रष्ट्राचार झाल्याचे आरोप केले जात आहे तर या घोटाळ्यांची चौकशीची मागणी हि त्रस्त नागरिकांकडून केल्या जात आहे. असेही सूत्रांकडून माहिती मिळालेली नुसार वक्फ बोर्डच्या काही विभागातील अधिकारी कर्मचारी या खोट्या नाट्य, मनमानी कारभार व घोटाळ्यात सहभागी आहेत. मुंबई वक्फ कार्यालय मध्ये सर्वकाही व्यवस्थित केल्या जातात व छत्रपती संभाजीनगर वक्फ कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने त्याला रीतसर व्यवस्थित मार्गी लावण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोप आता होऊ लागले आहे.
ज्यांच्या सहकार्याने हा सर्व खेळ सुरु आहे ते लवकरच चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता असल्याची चर्चा कार्यालयात जोरात सुरु आहे. हे अनागोंदी कारभार आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच दैनिक लोकनिष्ठ ने प्रकाशित केलेली मुख्यमंत्री सहायता निधीला वक्फ मंडळाचे चेअरमन समीर काझी यांनी वक्फ मंडळातर्फे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिनांक १३/१०/२०२५ रोजीचा दिलेले २५ लाखाचे धनादेशची बातमीची चर्चा राज्यभरात सध्या जोरात सुरु आहे. अनेक वक्फ घोटाळे व भ्रष्टाचार उघड केल्याने दैनिक लोकनिष्ठ चे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे तर काहींना आम्हाला सावध राहण्याची व स्वतःची काळजी घेण्याचे सल्ला हि दिले. वक्फ बोर्डातील घोटाळे - भ्रष्ट्राचार व मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये दिलेल्या धनादेश बाबतीत प्रकरण चव्हाट्यावर आणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अल्पसंख्याक विकास मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निदर्शनास आणून देऊन कारवाहीची मागणी केले जात आहे.
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडून अध्यक्ष / चेअरमन समीर काझी यांनी मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये धनादेश दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फेसबुक आणि द्विटर अकाउंटवरील फोटो व्हायरल होत आहेत. समाजातील व्यक्ती आणि संस्थांकडून आर्थिक मदत देण्यात येत असल्याने मुख्यमंत्रीही अशी मदत करणाऱ्यांबरोबर धनादेश स्वीकारताना फोटो काढतात आणि ते आपल्या फेसबुक आणि द्विटर अकाउंटवर शेअर करतात.
मात्र काही प्रकरणांत केवळ मुख्यमंत्र्यांबरोबर फोटो काढण्यासाठी असे धनादेश देतात आणि नंतर हे धनादेश वटतच नसल्याचे दिसून येत आहे. अशी अनेक प्रकरणे आहेत पण सरकारमध्ये असलेल्या आपल्याच नेत्याशी थट्टा करणे किती योग्य आहे.
एखाद्या सामान्य व्यक्तीने प्रसिद्धी आणि नाव कमावण्यासाठी अशा स्वस्त युक्त्यांचा अवलंब करणे कदाचित समजण्यासारखे आहे, परंतु सरकारने ज्या व्यक्तीची उच्च पदावर नियुक्ती केली, मन सम्मान दिला आणि जिच्यावर महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत, ती व्यक्ती अशा घृणास्पद कृत्य कशी काय सहभागी होऊ शकते? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित होत असले तरी या प्रकरणी असे का झाले हे अद्याप समजू शकले नाही. पण याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून लवकरच माहिती प्राप्त झाल्यानंतर नागरिकांची शंका दूर केले जाईल हे मात्र नक्की...
महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री सहायता निधीला मुख्यमंत्र्यांना खोटे व बोगस देयक किंवा कागदपत्रे देऊन फसवल्याची विविध प्रकरणे वेळोवेळी समोर आलेली आहेत. माध्यमात व वृत्तपत्रात अशी अनेक बातमीच्या प्रकशित झालेली आहे. अशाच एका ठळक प्रकारात मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २५ लाख रुपयांची मदद वक्फ मंडळाने दिल्याचे प्रकरण गुलदस्त्यात असल्याची माहिती समोर येत आहे.
दैनिक लोकनिष्ठ च्या बातमीची दाखल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेतीलच अशी अशा अपेक्षित आहेत. वक्फ बोर्डच्या मनमानी कारभार, घोटाळे, अनियमित आणि भ्रष्ट्राचार काही नवीन नाहीत, कोट्यावधींची जमिनीचा खेळ परस्पर आदेश, मंजुरी आणि वक्फ बोर्डला आर्थिक नुकसान यासर्व बाबीची दाखल घेऊन चौकशी कारवाही करत वक्फ कारभाराचे लेखापरीक्षणाची अत्यंत गरज असल्याची मागणी नागरिकांना कडून केले जात आहे.
वक्फ की नॉन वक्फ महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या अनोखे खेळ साध्या जोरात सुरू आहे याची माहिती अशी की, मराठवाडा वक्फ बोर्डाच्या कार्यकाळात ज्या वक्फ संस्था/ट्रस्ट, वक्फ मालम त्तेची नोंद महसुल अभिलेख व त्यापूर्वीचे जुने नोंदणी वक्फ बोर्डात वक्फ असल्याची नोंद, रजिस्ट्रेशन नोंदणी झालेली आहे त्या ५० ते ६० वर्षीच्या जुन्या रेकॉर्ड मध्ये वक्फ मालमत्तेचे नोंद आहे तर अशी मालमत्तांचे नोंदणी नंतरच्या वक्फ कायदा १९९५ अन्वये ही वक्फ मालमत्ता असल्याची नोंद झालेली आहे त्या संस्था/ट्रस्ट आता या २०२५ २०२६ साली वक्फ मालमत्ता, वक्फ संस्था/ट्रस्ट (नॉन वक्फ) नसल्याचे म्हणणे कितपत योग्य ठरेल. न्यायच्या दृष्टीने हे सगळे प्रकार उघडकीस आले पाहिजेत असे वाटते का तुम्हाला वाटत असेल तर ते पण उघड झाली पाहिजे याची शासनाने दाखल घेतली आहे किंवा नाही पण हे सगळे गोंधळात वक्फ बोर्डाच्या कोट्यवधींची मिळकतीचे नुकसान होणार आहे आणि शासनाचे ही मोठे नुकसान होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात होत असलेल्या मनमानी कारभाराची चौकशी होणार आहे का हे बघायला हवे.





प्रतिक्रिया द्या