trending_up TRENDING:

हिमायत बाग गट न.२२ जमीन निजाम वंशजाची की, शासकीय ?

दिशाभूल करुन नामांतर व फेरफार प्रकरणे मार्गी लावण्याचे प्रयत्न...

person
हिमायत बाग गट न.२२ जमीन निजाम वंशजाची की, शासकीय ?

छत्रपती संभाजीनगर (दैनिक लोकनिष्ठ) गेल्या काही म हिन्यापासून प्रशासकीय वर्तुळात चर्चेत असलेले शहरातील हिमायत बाग गट न.२२ मधील ७ एकर २ गुंठे जमीन प्रकरण शासन आणि प्रशासनाच्या डोळ्यांत सलल्यासारखे वाटते. तर काही लोकांना हे खटकत हि आहे. ज्या प्रकारे हा खेळ खेळण्याचा प्रयत्न केला जात होता... त्याच वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीने खेळ बिघडवला असल्याचे सध्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनगरचे उपविभागीय अधिकारी आणि अपर तहसीलदार यांच्याकडील प्रकरणे मार्गी लागतील अशी खात्री या लोकांना आहेच हे कश्यावरुन हे वेगळे सांगण्याची गरज नाहीत. हिमायतबाग जमिनीवर यापूर्वीही दावा करण्यात आला होता त्या भामट्याला पोलिसानी बेड्या ठोकल्या होत्या.


हिमायतबाग गट न.२२ मधील ७ आकार २ गुंठे जमीन प्रकरणी सुरु असलेले वाद विवाद हे इतके वर्षानंतर पुन्हा का सुरु झाले. भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा मीर उस्मान अली खान निजाम होते. मीर उस्मान अली खान यांचे १९६७ मध्ये निधन झाल्याचे रेकॉर्ड म ध्ये दर्शवितात.


निजामच्या वंशजांमध्ये हि संपत्ती साठी कायदेशीर लढाई होत्या. सातवे निजाम मीर उस्मान अली खान चे वंशज आणि इतर निजाम वंशज ची सांख्य मोठी आहे. हजारो कोटींच्या संपत्तीसाठी निजाम कुटुंबीय मध्ये कायदेशीर लढाई होती निजामचे किती वंशज आहेत आणि त्यांची संपत्ती किती व कुठे आहे याचा रेकॉर्ड वरील सर्व काही सरकार च्या रेकॉर्ड वरून दिसून येते. मीर उस्मान अली खान यांच्या निधनानंतर त्यांचे उत्तराधिकारी व मानले जाऊ लागलेले आठवे आणि शेवटचे निझाम मुकर्रम जाह हे होते. निजाम च्या वंशज आणि छत्रपती संभाजीनगर शहरात त्यांच्या संपत्ती आहेस मात्र त्यावर दावा करणारे खरेदीखत, मुखत्यारआम जीपीए बाबत सखोल चौकशी अत्यंत महत्वाच्या वाटते. अशातच हिमायतबाग गट न.२२ वरील दावे हे हि संशय च्या भोवऱ्यात असल्याचे सांगितले जात आहे.


निजामाचा वंशज असल्याची थाप मारुन भामट्याने हिमायतबाग कृषी विद्यापीठ फळ संशोधन केंद्राची जमीन शिक्षकाला परस्पर विकल्याचे घटना यापूर्वी घडलेली आहे. मात्र हिमायतबाग मधील विकलेली जमीन निजामाची नसून कृषी विभागीय फळ संशोधन केंद्राची असल्याचे उघड झाल्याने बेगमपुरा पोलिसांनी निजामाचा वंशज असल्याची भामटेगिरी करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या होत्या. याप्रकरणी लवकरच माहिती मिळाल्यावर स्पष्टपणे निजाम वंशज व मीर उस्मान अली खान यांच्या संपत्ती व प्रकरणात असलेले वंशजांचे नाते मांडता येईल. आता या प्रकरणाला शहरात खूप प्रतिसाद मिळत आहे तर सर्वांचे लक्ष याच्या निकालाकडे लागले असल्याचे म्हटले जात आहे.

SELF
शेअर करा: share Facebook share Twitter share WhatsApp
person

लेखकाबद्दल

Yunus Khan

Yunus Khan हे दैनिक लोकनिष्ठचे वार्ताहर आहेत. ते महाराष्ट्राच्या विविध विषयांवर सखोल लेखन करतात.

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Aurangabad

Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?

Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: छत्रपती संभाजीनगर येथील खवड्या डोंगरावरुन खाली पडून तीन जणांचा मृत्यू झाला. सदर घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला.

comment प्रतिक्रिया (0)

प्रतिक्रिया द्या