Demo
trending_up TRENDING:

दैनिक लोकनिष्ठ चा जबर दणका पडताच २५ लाखाचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

लोकनिष्ठ मध्ये बातमी येताच वक्फ मंडळ खडबडून जागे झाले

person
दैनिक लोकनिष्ठ चा जबर दणका पडताच २५ लाखाचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

छत्रपती संभाजीनगर (दै. लोकनिष्ठ)


महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळच्या बाबतीत उत्पन्नाची बाजू लंगडी आहे. वक्फ मंडळाच्या मनमानी कारभार आणि मनमानी खर्च त्यामुळे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असे चित्र आहे. मात्र आपली चमकूगिरीसाठी वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांनी आपल्या नेत्याला खुश करण्याकरिता व स्वतःच्या राजकीय लाभासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये अतिवृष्टीग्रस्तांसाठी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वक्फ बोर्डकडून २५ लाख रुपयांचा धनादेश (चेक) दिनांक १३/१०/२०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (तत्कालीन) मंत्री माणिकराव कोकाटे व इतरांच्या समक्ष सुपूर्द केला होता. ज्याचे मुख्यमंत्रीयांनी आभार हि मानले होते आणि मुख्यमंत्री कार्यालय ने व स्वतः मुख्यमंत्रीयांनी फोटो पोस्ट केली होती.


दिनांक १३/१०/२०२५ रोजीचा स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचा २५ लाखाचा (चेक) धनादेश क्र. १४९६०४ जे कि फोटो मध्ये दिसून येते त्याच्यात वक्फ मंडळाचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सय्यद जुनैद यांची सवाक्षरी स्पष्ट दिसते. मात्र दैनिक लोकनिष्ठ ने हे चमकूगिरी चे खोटेनाटे खेळाचा पर्दाफाश केला व राज्य सरकार आणि आम च्या वाचकांच्या समोर खोटे प्रकरण दैनिक लोकनिष्ठ च्या दि.२९/जून/२०२६ आणि ०७/जुलै/२०२६ च्या अंकात प्रकाशित करून वक्फ मंडळ आणि अध्यक्षांची पोलखोल केल्याने दैनिक लोकनिष्ठच्या बातम्यांची दाखल राज्य सरकार व मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली होती. दैनिक लोकनिष्ठ च्या या बातमीमुळे वक्फ प्रशासन आणि अध्यक्ष मध्ये खळबळी मजली होती. सरकारला मूर्ख बनविणाऱ्यांना लाज वाटली व नवीन नियोजन तयार केल्या.


दैनिक लोकनिष्ठ च्या बातमीने घाबरलेले वक्फ मंडळाने धसका घेतला व २५ लाख चा खरोखर धनादेश देण्याची तयारी सुरु केल्या. दैनिक लोकनिष्ठ च्या दि.२९/जून/२०२६ आणि ०७/जुलै/२०२६ च्या बातमीने घाबरलेले व स्वतःच्या राजकीय प्रवास वाचविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीम ध्ये २५ लाख रुपयांचे भारतीय स्टेट बँकेचा धनादेश क्र. १४९६०५ दि. ०८/०७/२०२६ रोजी देण्यात आले दैनिक लोकनिष्ठ ची दि.२९/जून/२०२६ आणि ०७/जुलै/२०२६ रोजीची बातमी खरी ठरली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणगी मिळाल्याची माहिती प्रसादकुमार सांगळे अवर सचिव मुख्यमंत्री सचिवालय यांनी दैनिक लोकनिष्ठ चे संपादक युनूस खान यांना दिली आहे. दैनिक लोकनिष्ठची बातमीचा दणका बसताच खोटारडेनचे धाबेदणाणले .

SELF
शेअर करा: share Facebook share Twitter share WhatsApp
person

लेखकाबद्दल

Dainik Loknisht

Dainik Loknisht हे दैनिक लोकनिष्ठचे वार्ताहर आहेत. ते महाराष्ट्राच्या विविध विषयांवर सखोल लेखन करतात.

संबंधित बातम्या

शासनाने नाकारलेल्या माजीद पटेलला वक्फ प्रशासनाचा आशीर्वाद!
Aurangabad

शासनाने नाकारलेल्या माजीद पटेलला वक्फ प्रशासनाचा आशीर्वाद!

निवृत्त अधिकाऱ्याच्या पुन्हा नियुक्तीवर प्रशासनाचा मौन...

वक्फ मंडळाने मुख्यमंत्री सहायता निधीला नाममात्र दिलेला धनादेश गुलदस्त्यात
Aurangabad

वक्फ मंडळाने मुख्यमंत्री सहायता निधीला नाममात्र दिलेला धनादेश गुलदस्त्यात

आपल्याच नेत्याची थट्टा केल्यामुळे अध्यक्षांवर मोठी ओढवली !

वक्फ बोर्ड चेअरमन समीर काझींची चमकूगिरीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २५ लाखांची देणगी !
Aurangabad

वक्फ बोर्ड चेअरमन समीर काझींची चमकूगिरीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २५ लाखांची देणगी !

उमीद पोर्टलवर ९८ टक्के ऑनलाईन नोंदणी, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची उल्लेखनीय कामगिरी
Aurangabad

उमीद पोर्टलवर ९८ टक्के ऑनलाईन नोंदणी, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची उल्लेखनीय कामगिरी

comment प्रतिक्रिया (0)

प्रतिक्रिया द्या