छत्रपती संभाजीनगर (लोकनिष्ठ)
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची स्वतःची आर्थिक परिस्थिती संकटात असलेल्या वक्फ मंडळाचे चेअरमन समीर काझी यांनी आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी स्वतःच्या लाभासाठी, चमकूगिरी करण्याकरिता, नेत्यांना खूश करण्यासाठी किंवा राजकीय फायदा मिळवण्यासाठी दिनांक १३/१०/२०२५ रोजीचा धनादेश (चेक) अतिवृष्टीग्रस्तांसाठी शेतकऱ्यांच्या मदततीसाठी वक्फ बोर्डकडून मुख्यमंत्री मदत निधीकडे २५ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (तत्कालीन) अल्पसंख्याक विकास मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री व मंत्रालयातील इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुपूर्द केला होता. ज्याची फोटो सीएमओ कार्यालय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व स्वतः चेअरमन समीर काझी यांनी पोस्ट केली होती.
आतिवृष्टीग्रस्तांसाठी शेतकऱ्यांच्या मदततीसाठी वक्फ बोर्डकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे २५ लाख रुपयांचा धनादेश दिल्या बद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्विटकरून आभार हि मानले होते. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ प्रशासनाकडून २५ लाखचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आले त्या धनादेशावर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सय्यद जुनैद यांची सवाक्षरी असल्याचे फोटोमध्ये स्पष्ट दिसून येते मात्र २५ लाखचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याच्या कार्यक्रमाला तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सय्यद जुनैद कुठे हि दिसून येत नाही किंवा त्यांना या कार्यक्रमाबाबत माहिती देण्यात आली नाही. वक्फ मंडळाच्या प्रशासनिक कार्यक्रमाच्या फोटोमध्ये सय्यद जुनैद का दिसत नाहीत. हा कार्यक्रम चेअरमन समीर काझी यांचा राजकीय स्टंट होता कि राजकीय देखावा ? सम ीर काझी यांचा वक्फ चेअरमन चा कार्यकाळ लवकरच संपणार आहे, आपल्या नेत्यांना स्वतः च्या लाभाच्या दृष्टीने व आपली वर्णी उच्च पदावर लावण्यासाठी हा कार्यक्रम समीर काझी यांच्या प्रसिद्धीपुरता दानशूरपणाचा आव आणल्याचे प्रकार उघडकीस झाले आहे.
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ प्रशासनाकडून २५ लाखचा स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचा दिनांक १३/१०/२०२५ रोजीचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आले त्या फोटो धनादेशावर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सय्यद जुनैद यांची स्वक्षरी दिसून येते. मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये २५ लाखाचा धनादेश देण्याबाबत चेअरमन समीर काझी व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सय्यद जुनैद मध्ये मदभेद होता. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या कामकाजाची पद्धत नियम व कायद्यानुसार असते प्रत्येक महत्वाच्या निर्णय घेण्याचा अधिकार वक्फ मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मान्यता मंजुरी आवशयक असते मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २५ लाखाचा धनादेश देण्याचा निर्णय एकटे समीर काझी घेऊ शकत नाही त्यासाठी प्रस्ताव तयार करणे प्रशासनाची मंजुरी घेऊन बोर्ड मीटिंग मध्ये प्रस्ताव ठेवणे गरजेचे आहे आणि त्यावर बोर्ड अध्यक्ष, सदस्यांची सहमती असणे नंतरच प्रस्ताव मंजूर केल्या जातात मात्र या बोर्डचा गोंदळलेला प्रस्ताव व प्रशासकीय मान्यता लपविण्याचा खेळ खेळला जात आहे. या मान्यता व मंजुरी प्रस्तावाला एवढा गुप्त का ठेवले जाते या बाबत दैनिक लोकनिष्ठ ने अनेक वेळा विचारानं केल्या मात्र खरी माहिती देण्यास किंवा यावर बोलण्यास नकार देण्यात आले व थाथुर माथूर उतारे देऊन टाळण्याचे प्रयत्न करण्यात आल्याचे समजले. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिलेला धनादेश मुख्यमंत्री कार्यालयाची आणि सरकारची चमकूगिरीच्या नादात फसवणूक तर झाले नाही ना याबाबत लवकरच कळेल... !
तत्कालीन सीईओ जुनैद व समीर काझी यांची जुगलबंदी बऱ्याच बाबतीत चांगली होती या दोघांनी संगमताने बऱ्याच फाईल मार्गी लावल्या गौरगरिबांचे अनेक प्रकरणे प्रलंबित
असतांना लाभदायक फाईल महत्वाच्या नावावर मार्गी लावल्या, ज्यामुळे वक्फ मंडळाच्या काम काजावर ठपका ठेवले जात आहे. वक्फ बोर्डच्या भ्रष्ट्राचारावर बऱ्याच काही आहे पण आता राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना मंत्रीलाच शहाणपण दाखविल्याची माहिती समोर येत आहे.
जुनैद यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी देण्याचे कार्यक्रमाची माहिती होती मात्र त्यांनी आपल्याला या कार्यक्रमापासून दूर ठेवले होते यात काही तरी अनागोंदी झाल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलेल्या धनादेशाबाबत वक्फ प्रशासनाकडून व मंडळाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न दैनिक लोकनिष्ठ ने केले मात्र याची माहिती देण्यास किंवा सांगण्यास सर्वांनी टाळले. समीर काझी यांनी आपली मनमानी करून आपल्या नेत्यांची शाबासकी मिळविण्यासाठी व स्वतःची चमकूगिरीसाठी हा खोटेनाटे खेळ खेळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची आर्थिक स्थिती सध्या खूपच वाईट आहे. इमाम आणि मोइझन यांना त्यांचे पगार वेळेवर मिळत नाहीत आणि ते भाड्याच्या कार्यालयांमधून
आपला कारभार चालवत आहेत. वक्फ मंडळाची परिस्थिती दयनीय असल्याचे म्हटले जात आहे. अनेक धार्मिक स्थळांची देखभाल रखडली आहे आणि बहुतेक कार्यालये अजूनही भाड्याच्या इमारतींमधूनच कार्यरत आहेत. या संदर्भात, मंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांनी मुख्यमंत्री मदत निधीला दिलेली २५ लाख रुपयांची देणगी चर्चेचा विषय बनली आहे. मानवतावादी मदत हा यामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले, परंतु मंडळाची बिकट आर्थिक परिस्थिती पाहता, या निर्णयामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. हा प्रश्न विचारणे स्वाभाविक आहे की, जेव्हा वक्फ बोर्ड स्वतःच आर्थिक संकटाचा सामना करत आहे, तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यता निधीला २५ लाख रुपये देण्याची काय गरज होती? हे पाऊल आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता की एक राजकीय देखावा ? महाराष्ट्र वक्फ बोर्डाची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय असूनही, अध्यक्ष समीर काझी यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आहे त्या धनादेशाचे काय झाले ? बँकेत धनादेश पास झाला आहे का ? कि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मिळालेले २५ लाख रुपयांचा धनादेश बोगस याचा खुलासा बोर्डच्या मुख्य कार्यकारी अधिकारी फय्याज खान व चेअरमन समीर काझी यांनी करावा जेणेकरून आमच्या मनात व लोकांमध्ये निर्माण झालेली शंका दूर होईल. तसे काय आहे हे प्रकरण लवकरच कळेल..!





प्रतिक्रिया द्या