trending_up TRENDING:

शिवसेना शिंदे गटाला भाजपचा मोठा धक्का, पुण्यातून मोठी बातमी

मोठी बातमी समोर येत आहे, भाजपने पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. महापालिका आणि त्यापूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, आता पुन्हा एकदा मोठी बातमी समोर आली आहे.

person
शिवसेना शिंदे गटाला भाजपचा मोठा धक्का, पुण्यातून मोठी बातमी

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर नगरपालिका, नगर परिषद आणि महापालिकांच्या निवडणूका पार पडल्या, या निवडणुकांमध्ये देखील भाजपला मोठं यश मिळालं होतं. भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला होता, तर या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गट हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. मात्र या निवडणुकीमध्ये भाजपकडून शिवसेना शिंदे गटाची डोकेदुखी वाढवण्यात आली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने युती केली होती, तर काही ठिकाणी दोन्ही पक्षाने वेगवेगळ्या निवडणुका लढवल्याचं पहायला मिळालं. दरम्यान जिथे-जिथे युती झाली नाही, तिथे-तिथे भाजपकडून शिवसेना शिंदे गटाचे अनेक संभाव्य उमेदवार फोडण्यात आल्याचं पहायला मिळालं, तसेच शिवसेना शिंदे गटाकडून ज्यांना तिकीट मिळालं नाही, त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. याचा मोठा फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसला होता. यावरून शिवसेना शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

दरम्यान आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे पुण्यात भाजपने शिवसेना शिंदे गटाला धक्का दिला आहे. कसब्यात शिवसेना शिंदे गटाला खिंडार पडलं आहे. कसब्यातील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पुण्याच्या कसब्यामधील शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. वैष्णवी किराड यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यावर आता रवींद्र धंगेकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.


नेमकं काय म्हणाले धंगेकर?


कोणी आले न आले तरी धंगेकर एकटा बास आहे. एकटा धंगेकर सगळ्यांना बास आहे, मला काय कोणाची मदत लागत नाही. मी कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांच्या जागी ठेवतो, त्यांचं भविष्य आहे, त्यांना काम करायचं आहे. तुम्ही पाहिलं असेल मी माझ्या राजकारणात कोणाला बरोबर घेत नाही, इथे एकटा धंगेकर बास आहे, अशी यावर प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांनी दिली आहे.

SELF
शेअर करा: share Facebook share Twitter share WhatsApp
person

लेखकाबद्दल

Kashaf Khan

Kashaf Khan हे दैनिक लोकनिष्ठचे वार्ताहर आहेत. ते महाराष्ट्राच्या विविध विषयांवर सखोल लेखन करतात.

संबंधित बातम्या

CJP : केंद्र सरकार पुन्हा सीजेपीच्या रडावर, 6 प्रश्नांची उत्तरं मागायची कुणाकडे? थेट सवालामुळे अडचण वाढली?
Politics

CJP : केंद्र सरकार पुन्हा सीजेपीच्या रडावर, 6 प्रश्नांची उत्तरं मागायची कुणाकडे? थेट सवालामुळे अडचण वाढली?

Saurav Das CJP: सौरव दास यांच्या मते, खासदाराने सहा मुद्द्यांवर प्रश्न विचारले होते. हे प्रश्न लोकसभेच्या नियम ४१ (२) अंतर्गत विविध उप-कलमांचा उल्लेख करून फेटाळण्यात आले.

माझ्याकडून चूक झाली…, गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रस पक्षप्रवेशाच्या दाव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Politics

माझ्याकडून चूक झाली…, गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रस पक्षप्रवेशाच्या दाव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

शनिवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल बोलताना मोठा दावा केला होता. गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये येणार होते. असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र आता त्यानंतर मुंडेंच्या पक्षप्रवेशाबाबत माझ्याकडून चूक झाली असं म्हटलं आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत; शिंदे गटाचे मुख्यमंत्रीपद
Politics

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत; शिंदे गटाचे मुख्यमंत्रीपद

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असून शिंदे गटाचे मुख्यमंत्रीपद निश्चित.

comment प्रतिक्रिया (0)

प्रतिक्रिया द्या