trending_up TRENDING:

वक्फ मंडळावर पुनर्नियुक्तीसाठी मुख्यमंत्री ते मंत्री आणि सचिवांकडे साकडे

person
वक्फ मंडळावर पुनर्नियुक्तीसाठी मुख्यमंत्री ते मंत्री आणि सचिवांकडे साकडे

सध्या महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे प्रशासन राजकीय दबाव खाली ठोस निर्णय घेण्यास लाचार झाल्याचे दिसून येत आहे. प्रशासकीय अधिकारी निर्णय घेणार तरी कसे निर्णय घेतला जाईल तर अनेक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही असे सांगितले जाते. बाणेर मस्जिद आणि दर्याहच्या जमीन प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर वक्फ मंडळात पुन्हा पद मिळवण्यासाठी माजी पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा मंत्रालयात व वक्फ वर्तुळात रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, या संभाव्य पुनर्नियुक्तीसाठी मुख्यमंत्री स्तरापासून मंत्री आणि वरिष्ठ सचिवांपर्यंत शिफारशी मिळवण्याचे प्रयत्न होत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

बाणेर मस्जिद-दर्गाह जमीन प्रकरणाचे सत्य समोर येणार पुनर्नियुक्तीच्या आधारावर दडपले जाणार? या कथित शिफारशींमागे नेमके कोणाचे राजकीय पाठबळ आहे? पुनर्नियुक्तीसाठी मंत्रालयात कोणत्या पातळीवर हालचाली सुरू आहेत? आणि बाणेर मस्जिद दर्गाह जमीन प्रकरणातील निर्णयप्रक्रियेचा या प्रयत्नांशी काही संबंध आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

बाणेर मस्जिद दर्गा प्रकरणाची चौकशी कधी?

बाणेर मस्जिदीच्या इनामी जमिनीच्या ठराव व निर्णय दर्याच्या नावावर झालेल्या प्रक्रियेबाबत पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले जात असतांना, त्याच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर संबंधित व्यक्तींना पुन्हा वक्फ मंडळात स्थान मिळवून देण्याचे प्रयत्न होत असल्याची चर्चा अधिकच गंभीर ठरत आहे.

मुख्यमंत्री ते सचिवांपर्यंत शिफारशींची चर्चा ! वक्फ मंडळावर पुनर्नियुक्तीसाठी मुख्यमंत्री, संबंधित मंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या स्तरावर शिफारशी मिळवण्याचे प्रयत्न होत असल्याचा दावा सूत्रांकडून केला जात आहे.

शासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी! बाणेर मस्जिद जमीन प्रकरणातील ठराव, आदेश आणि मागील बैठकींचे इतिवृत्त सार्वजनिक करावे. संबंधित जमिनीच्या प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करावी. तसेच वक्फ मंडळातील संभाव्य पुनर्नियुक्ती प्रक्रियेत कोणताही राजकीय किंवा प्रशासकीय दबाव नसल्याची पारदर्शकता शासनाने दाखवावी.

बाणेर मस्जिद-दर्गाह जमीन प्रकरणाचे सत्य समोर येणार की पुनर्नियुक्तीच्या राजकीय चर्चामध्ये हा विषय बाजूला पडणार? मुख्यमंत्री कार्यालय अल्पसंख्याक व औकाफ मंत्रालय आणि वक्फ प्रशासन या प्रश्नांवर काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

बैठकीचे इतिवृत्त प्रकरणात तीन वर्षांचा हिशेब कोण देणार? वक्फ मंडळाच्या सीईओंच्या कारवाईकडे लक्ष ! सत्य बाहेर येणार की प्रकरण दडपले जाणार?

तीन वर्षांपासून बैठकीचे इतिवृत्त शासकीय संकेतस्थळावर अपलोड नाही; संबंधित विभाग प्रमुखांवर कारवाई का नाही? वक्फ मंडळाच्या सीईओंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वक्फ मंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त तयार करून ते शासकीय संकेतस्थळावर अपलोड करण्याची जबाबदारी असलेल्या संबंधित बैठक विभाग प्रमुखांनी तब्बल तीन वर्षांपासून इतिवृत्त अपलोड केले नसल्याचा स्पष्ट दिसून येत आहे.

मग इतिवृत्त अपलोड न करण्यामागचे नेमके कारण काय? संबंधित बैठक विभाग अधिकाऱ्यांकडून खुलासा का मागवण्यात आला नाही? नियमांचे उल्लंघन झाले असल्यास निलंबनासह शिस्तभंगाची कारवाई का करण्यात आली नाही?

सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न करण्यामागे नेमके कोणाचे हितसंबंध आहेत ? की या प्रकरणात प्रशासकीय पातळीवरच दुर्लक्ष केले जात आहे?

बैठकीचे इतिवृत्त आणि प्रशासकीय निर्णय सार्वजनिक झाले पाहिजेत. वक्फ मंडळाचे सीईओ आता तरी या प्रकरणाची गंभीर दखल घेणार का? तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या इतिवृत्ताचा प्रश्न मार्गी लावून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रश्न एकच वारंवार उपस्थित केला जात आहे की, सत्य बाहेर येणार की प्रशासकीय दिरंगाईच्या पडद्याआड हा संपूर्ण प्रकार दडपला जाणार? आता वक्फ मंडळाच्या सीईओंनी मौन सोडून ठोस भूमिका घेण्याची वेळ आली आहे !

SELF
शेअर करा: share Facebook share Twitter share WhatsApp
person

लेखकाबद्दल

Kashaf Khan

Kashaf Khan हे दैनिक लोकनिष्ठचे वार्ताहर आहेत. ते महाराष्ट्राच्या विविध विषयांवर सखोल लेखन करतात.

संबंधित बातम्या

comment प्रतिक्रिया (0)

प्रतिक्रिया द्या