महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने बाणेर मशिदीची स्वतंत्र नोंदणी रद्द केली असून, त्यातून उद्भवणारे सर्व मालमत्ता व्यवहार अवैध घोषित केले आहेत. यामुळे बाणेर ता. हवेली जि. पुणे मधील सर्व्हे क्रमांक ९९/१ येथील सुमारे ७ हेक्टर ३४ आर जमिनीवरून जवळपास दोन दशकांपासून सुरू असलेल्या वादावर पडदा पडला आहे. दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी प्रकरण क्र.५२ अ/१९५/२०२५ पत्र.क्र. मरावमं / सुनावणी / सियानत/३५५/२०२६ अन्वये महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी फैय्याज खान यांनी २२ पानी आदेश जारी केला. मंडळाने हमीद हुमायून खान आणि इतरांनी मालमत्तेसंदर्भात दाखल केलेला आक्षेप स्वीकारला. म हाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने बाणेर मशिदीच्या मालकीची ७ हेक्टर आणि ३४ आर (सुमारे १८.१४ एकर) जमीन विकण्याची २००६ सालची परवानगी रद्द केली आहे, या मालमत्तेचे बाजारमूल्य अंदाजे १२०० ते १५०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
वक्फ मंडळाने वक्फ च्या हिताचे विचार करून एक चांगला निर्णय दिल्या असल्याचे बोलले जात आहे. पण बाणेर मस्जिद वक्फ जमीन वादावर व उडणशाह वली दर्गाह ट्रस्ट (बी३८२ पुणे) आणि बाणेर मशिद - एमएसडब्ल्यू / रजि / ४८७२ /२००५ दि १८/८/२००५ ची नोंदणी रद्द प्रकरणी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न का उपस्थित होते हा एक गंभीर विषयी आहे? बेकायदेशीर जमीन विक्री व्यवहार रद्द केले असल्यावर नोंदणी रद्द करण्यामागचे कारण काय ? उडणशाह वली दर्गाह आणि बाणेर मस्जिद प्रकरण पुन्हा गाजणार असल्याची शक्यता आहे. उडणशाह वली दर्गाह आणि बाणेर मस्जिद प्रकरणी धर्मादाय आयुक्त कार्यालय काय सांगतात आणि वक्फ मंडळ काय मांडतात यात खेळ कोणी मांडला ? असे प्रश्न उपस्थित केले जात असून या प्रकरणी वेगवेगळी माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने बाणेर मशिदीची स्वतंत्र नोंदणी रद्द केली असून, त्यातून निर्माण झालेल्या परवानग्या आणि मालमत्तेचे व्यवहार सुरुवातीपासूनच अवैध ठरवले आहेत. या निर्णयामुळे बाणेर मधील सर्व्हे क्रमांक ९९/१ येथील सुमारे ७ हेक्टर ३४ आर जमिनीवरील जवळपास दोन दशके जुना वाद संपुष्टात आला आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी फैय्याज खान यांनी २ सप्टेंबर २०२६ रोजी हा २२ पानी आदेश जारी केला. मंडळाने हमीद हुमायून खान आणि इतरांनी मालमत्तेसंदर्भात दाखल केलेला आक्षेप स्वीकारला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पारित केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, मशिदीची स्वतंत्र नोंदणी कायदेशीररित्या वैध नव्हती. तसेच, संबंधित ३ नोव्हेंबर २००६ चे ना-हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे आणि विवादास्पद नोंदणीवर आधारित विक्री परवानग्या व व्यवहार सुरुवातीपासूनच अवैध घोषित करण्यात आले आहेत. वक्फ मंडळाने पुढे बाणेर येथील हजरत उडणशाह वली दर्याला संबंधित वक्फ संस्था म्हणून मान्यता देण्यासाठी आणि महसूल व नोंदणी नोंदींमध्ये त्यानुसार बदल करण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र प्रश्न एकाच उपस्थित होते हि घाईगडबडी कोणी केली आणि याचा लाभ कोणाला मिळणार?
ही मालमत्ता सुमारे ७ हेक्टर ३४ आर, म्हणजेच जवळपास १८ एकर असून, ती ऐतिहासिक उदान शाह वली दर्गा आणि बाणेर म शिदीशी संबंधित आहे. वक्फ बोर्डाच्या आदेशानुसार, ही धार्मिक देणगी तत्कालीन मुंबई राज्यपालांनी १२ ऑगस्ट १८७० रोजीच्या आदेश क्रमांक ९८६ अन्वये दिलेल्या अनुदानातून प्राप्त झाली आहे. नंतर ही मालमत्ता उडण शाह वली दर्गा ट्रस्टशी संलग्न करण्यात आली, ज्याची धर्मादाय आयुक्तांकडे सार्वजनिक ट्रस्ट क्र. बी-३८२ म्हणून नोंदणी झाली होती. कार्यवाहीमध्ये एमएसडब्ल्यू / रजि / पुणे / ४८७२ /२००५ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाणेर मशिदीसाठी एक वेगळी नोंदणी तयार केल्यानंतर हा वाद निर्माण झाला. मंडळाने आता ती नोंदणी रद्द केली आहे. बोर्डाच्या मते, उडणशाह वली दर्याच्या पूर्वीच्या नोंदणीचा अर्थ असा होता की वक्फ कायदा, १९९५ च्या कलम ४३ अंतर्गत संस्था आणि तिच्या मालमत्ता नोंदणीकृत मानल्या जाणे आवश्यक होते. वक्फ मंडळाचा सत्तेच्या लाभासाठी बऱ्याच काही प्रयत्न होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हा वाद २००५ सालचा आहे, जेव्हा जमि नीची विक्री करण्याची परवानगी मागण्यासाठी मूतवल्ली रज्जाक लालभाई सय्यद यांनी (तत्कालीन चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ यांच्या कडे दि. २०/१०/२००५ रोजी अर्ज करण्यात आला होता. २९ सप्टेंबर २००६ रोजी, एका आदेशाने ती मालमत्ता ₹९.५१ कोटींना विकण्यास परवानगी दिली. कार्यवाहीनुसार, ₹७ कोटी वक्फ बोर्डाला द्यायचे होते. दि.३०/११/२००५ रोजीच्या ठराव अन्वये चेअरमन यांनी आदेश काढल्याचे दिसते. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ३ नोव्हेंबर २००६ रोजी एक स्वतंत्र ना हरकत प्रमाणपत्र जारी केले. त्यावर आक्षेप नोंदविण्यात आले आहे. त्यानंतर ३१ ऑक्टोबर २००९ रोजी विक्रीपत्र कार्यान्वित करण्यात आले. हा व्यवहार दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर वादाचा आणि प्रशासकीय कार्यवाहीचा विषय बनला असला तरी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
हमीद हुमायू खान या अर्जदारांनी दि. २०/१०/२००५ रोजी अर्ज व परवानगी दि. २९/०९/२००६ आणि पत्र ३०/११/२००५ याला ज्या प्राधिकरणाच्या अंतर्गत विक्रीची परवानगी आणि ना हरकत प्रमाणपत्र जारी करण्यात आले होते, त्याला आव्हान दिले. तसेच, वक्फ बोर्डाची आवश्यक मंजुरी घेण्यात आली होती की नाही यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि विक्रीसाठी अवलंबलेल्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवला. मंडळाने आता असे ठरवले आहे की बाणेर मशिदीची स्वतंत्र नोंदणीच अवैध होती. परिणामी, त्या नोंदणीवर आधारित परवानग्या आणि व्यवहार देखील सुरुवातीपासूनच रद्दबातल घोषित करण्यात आले आहेत. तत्कालीन अध्यक्षांना ते जारी करण्याचा कायदेशीर अधिकार नव्हता, असे मत मंडळाने विशेषतः ३ नोव्हेंबर २००६ चे ना हरकत प्रमाणपत्र रद्द केले. अर्जदारांनी आवश्यक संचालक मंडळाची मंजुरी, सार्वजनिक लिलाव आणि योग्य मूल्यांकनाचा अभाव याबद्दलही प्रश्न उपस्थित केले होते. तथापि, प्रतिवादींनी या दाव्यांना विरोध केला आणि विक्री प्रक्रिया आवश्यक कार्यपद्धतीनुसारच पार पडली असल्याचा दावा केला. त्यांनी जुने प्रकरण पुन्हा उघडण्याच्या वक्फ बोर्डाच्या अधिकार क्षेत्रालाही आव्हान दिले आणि हा वाद वक्फ न्यायाधिकरणासमोर नेला पाहिजे होता असा युक्तिवाद केला. मंडळाने हे आक्षेप फेटाळून लावले आणि हमीद खान व इतरांनी दाखल केलेला अर्ज स्वीकारला.
वक्फ मंडळात पुन्हा संधी मिळतील का? तत्कालीन वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद यांनी २७ मे रोजी जारी केलेल्या पत्रानंतर २०२५ मध्ये हा वाद पुन्हा उफाळून आला. म ालमत्तेसंदर्भात महसूल अधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आले. त्यानंतर जुलै २०२५ मध्ये महसूल नोंदींमध्ये बदल करण्यात आला. दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी प्रकरण क्र.५२ अ/१९५/२०२५ पत्र.क्र.मरावमं / सुनावणी / सियानत/३५५/२०२६ च्या आदेशाने आता २७ मे, २०२५ रोजीचे पत्रक रद्द केले असून महसूल नोंदींसंबंधी परिणामकारक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. वक्फ मंडळाने पुणे जिल्हा प्रशासन आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना, मालमत्तेशी संबंधित वक्फ संस्था म्हणून उडणशाह वली दर्गाहचे नाव दर्शविणाऱ्या नोंदी करण्यास सांगितले आहे. तसेच, आता अवैध घोषित केलेल्या व्यवहारांमधून निर्माण झालेल्या महसुली नोंदी आणि विक्री करार रद्द करण्यासंदर्भात उपाययोजना करण्याचे निर्देशही दिले आहेत.
बाणेर मस्जिद वक्फ जमीन वादावर दबाव कोणाचा? खरेदीदारांनी कार्यवाहीला विरोध केला खरेदीदार आणि इतर प्रतिवादींनी मंडळासमोरच्या अर्जाला विरोध केला. त्यांनी असा युक्तिवाद केला की, वक्फ बोर्ड अनेक वर्षांनंतर आपला पूर्वीचा निर्णय पुन्हा उघडू किंवा त्याचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यांनी अर्जदारांच्या कायदेशीर पात्रतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि असा युक्तिवाद केला की हे आव्हान मुदतीमुळे बाद ठरले आहे. प्रतिवादींनी असा दावा केला की विक्री प्रक्रिया लागू असलेल्या कार्यपद्धतीनुसारच पार पडली होती. त्यांनी वृत्तपत्रातील जाहिरात, संचालक मंडळाच्या बैठकीत प्रस्तावावर झालेला विचार आणि २००६ च्या परवानगीपूर्वी उचललेल्या इतर पावलांचा संदर्भ दिला. त्यांनी असा युक्तिवादही केला की २००९ चा विक्री करार ३ नोव्हेंबर २००६ च्या सीईओ आदेशाच्या ३६ महिन्यांच्या आत करण्यात आला होता आणि त्यांनी स्वतःला सद्भावनेने खरेदी करणारे म्हणून संबोधले. मात्र, मंडळाने त्यांचे आक्षेप स्वीकारले नाहीत.
मूळ अनुदानधारकाच्या वंशजांनीही दावे केले या कार्यवाहीमध्ये मालमत्तेच्या मूळ धारकाचे वंशज आणि कायदेशीर वारस यांचाही समावेश होता. त्यांनी असा दावा केला की, ती मालमत्ता कायमस्वरूपी वक्फ म्हणून समर्पित करण्यात आली नव्हती आणि नंतर ती वक्फ मालमत्ता म्हणून ज्या आधारावर नोंदवली गेली, त्या आधारावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी फसवणूक, दिशाभूल आणि महत्त्वपूर्ण माहिती दडपल्याचे आरोपही केले. तथापि, अंतिम आदेशात उडणशाह वली दर्याला संबंधित संस्था म्हणून मान्यता देण्यात आली आहे आणि वक्फ कायद्याच्या कलम ४३ अंतर्गत त्याच्या मालमत्तेसह त्याला नोंदणीकृत मानण्याचे निर्देश दिले आहेत. मंडळाच्या आदेशानुसार आता पुणे जिल्हा प्रशासन, महसूल अधिकारी आणि नोंदणी अधिकाऱ्यांकडून कारवाई करणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांना वक्फ नोंदणी, विक्रीपत्रे आणि महसूल नोंदींसंबंधीच्या निर्देशांची अंमलबजावणी करावी लागेल. असे मंडळाच्या आदेशात म्हटले असले तरी कलम ४३ बाबत वाद अद्याप संपलेला नसल्याची माहिती समोर येत आहे.
बाणेर मस्जिद कि उडणशाह वली दर्गाह नक्की काय ? हा आदेश बाणेरच्या एका प्रमुख धार्मिक मालमत्तेवरील वादात एक महत्त्वपूर्ण घडामोड आहे. या प्रकरणात जवळपास दोन दशकांपासून वक्फ बोर्ड, खाजगी खरेदीदार, विकासक आणि मूळ मालकाचे वंशज सामील आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे आदेश एक चांगल्या दिशेने व वक्फ मिळकती वाचविण्याच्या दृष्टीने असल्या तरी सर्व्हे क्रमांक ९९/१ सुमारे ७ हेक्टर ३४ आर, म्हणजेच जवळपास १८ एकर जमीन उडणशाह वली दर्गाह आणि बाणेर मशिदीशी संबंधित आहे वक्फ मंडळाने याची नोंदणी रद्द केल्याने विविध तर्कवितर्क लावले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. सूत्रांच्या माहिती नुसार २ सप्टेंबर २०२६ रोजीचा आदेश वादांकित ठरणार असल्याचे दिसून येत आहे.
उडणशाह वली दर्गाह ला वक्फ संस्था म्हणून मान्यता देण्यात आली आहे. पण उडणशाह वली दर्गाह विषयी वेगवेगळी भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. वक्फ मंडळाची सत्ता पुन्हा मिळविण्याची हालचाली सुरु असतांना उडणशाह वली दर्गाह आणि बाणेर मशिदीचा प्रलंबित प्रकरण मार्गी लावण्याचे मुख्य कारण काय ? असेही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. आता याप्रकरणी नवीन काय होणार आहे आणि पुढची भूमिका काय हे पाहावे ...!





प्रतिक्रिया द्या