वक्फ मंडळाच्या नियम आणि कायद्यांना थेट केराची टोपली दाखवत महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ मनमानीपद्धतीने काम करत असल्याचे प्रकरण उघडकीस आला आहे. पुणे बाणेर मस्जिद प्रकरण पुन्हा राज्यात गाजणार महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ आणि प्रशासनाच्या अडचणी वाढत चालल्याचे दिसते. सूत्रांचे म्हणणे आहे कि, १२०० कोटींची बाणेर मस्जिदची जमिनीबाबत स्वतःच रचलेल्या सापळ्यात वक्फ मंडळ अडकत चालला आहेत.
मंडळाने ठराव क्र.२१ मंजूर करून मोठी आश्वासने दिली होती आणि मोठी स्वप्ने दाखविली आणि पाहिली हि होती, ती मालमत्ता बळकावून काही योजना मांडली होती. परंतु परिस्थितीने त्यांची स्वप्ने मोडीत काढली आणि आता ते करोडो रुपयांचे स्वप्न कोलमडून पडताना दिसत आहे. कायदा व नियमानुसार वक्फ मंडळाच्या बैठकीत दिनांक ११/८/२०२६ रोजी ठराव क्र. २१ बेकायदेशीर ठरत असून तो लवकरच रद्द होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
माहिती नुसार दिनांक ११/८/२०२६ रोजी ठराव क्र.२१ पारित करतांना मंडळाच्या पांच सभासदांनी ठराव मंजूर होता. ठराव मंजूर करतांना ज्या दोन सदस्यांना बैठकीत शामिल होण्याचा व बैठकीत ठराव मंजुरीवर स्वाक्षरी करण्याचा अधिकारच नाव्होता त्या दोन सदस्यांनी बैठकीत उपस्थिती नोंदविली व ठराव क्र.२१ व त्यासोबतीच्या ठरावांवर मंजुरी दाखवत ठरावावर स्वाक्षरी हि केलाय. हे कायदा व नियमांचे उल्लंघन व अधिकार नसतांना पदाचा दुरुपयोग नाहीत का? असा प्रश्न उपस्थित केले जात आहे. ठराव क्र. २१ बेकायदेशीर तर दि. ०२/सप्टेंबर २०२६ रोजी प्रकरण क्र.५२ अ/१९५/२०२५ चे आदेशाचे काय होणार ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात काय चाललंय ? महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलची निवडणूक २४ मार्च २०२६ रोजी पार पडली म्हणजे त्यानंतरचे वक्फ मंडळाने पारित व मंजूर केलेले ठराव अवैध ठरविले जातील अशी शक्यता नाकारता येत नाही. सध्या मंत्रालयात वक्फ मंडळावर नियुक्तीची जोरदार हालचाली सुरु असल्याची चर्चा आहे. आता हि पुन्हा संधी सरकार देणार का ?
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलची निवडणूक २४ मार्च २०२६ रोजी पार पडली. या निवडणुकीत अॅडव्होकेट सय्यद इफ्तेखार सय्यद इनायत हाश्मी (अनुक्रमांक १३५) आणि अॅडव्होकेट अहमद खान उस्मान खान पठाण (अनुक्रम ांक ९९) हे उमेदवार होते. वक्फ कायदा, १९९५ आणि वक्फ (सुधारणा) कायदा, २०२५ च्या तरतुदीनुसार (कलम १४), महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डावर 'बार कौन्सिल'मधून नियुक्त व्यक्तींचे सदस्यत्व हे त्यांच्या 'बार कौन्सिल'मधील सदस्यत्वाच्या कालावधीपर्यंतच मर्यादित असते. बार कौन्सिल निवडणुकीत उमेदवार बनल्यानंतर संबंधित व्यक्तीची सक्रिय सदस्यत्वाची स्थिती बदलते; अशा परिस्थितीत त्यांनी वक्फ बोर्डातील पद भूषवणे किंवा निर्णय प्रक्रियेत सहभागी होणे सुरू ठेवू नये. सर्वोच न्यायालयाच्या २२ एप्रिल २०२५ रोजीच्या आदेशानुसार, बार कौन्सिल निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहणे किंवा बार कौन्सिलमधील सक्रिय सदस्यत्व संपुष्टात येणे, यामुळे संबंधित व्यक्ती वक्फ बोर्डावर राहण्यास अपात्र ठरते. कायदा व नियम आणि सर्वोच न्यालयाच्या आदेश/उद्धरण या प्रमाणे २४ मार्च २०२६ नंतरच्या सर्व ठराव व आदेश बेकायदेशीर व अवैध ठरणार आणि दोषियांविरुद्ध कारवाही होण्याची दाट शक्यता आहे." दैनिक लोकनिष्ठ" वारंवार वक्फ मंडळाच्या भ्रष्ट व मनमानी कारभाराचे भांडाफोड करत आहे पण शासन आणि प्रशासनाची लाचारी असल्याचे दिसून येते. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे बाणेर मस्जिद आणि उडणशाह वली दर्गाह चे आदेश वादांकित ठरणार असल्याचे दैनिक लोकनिष्ठ यांनी सांगितले होते. मंत्रालय कनेक्शन आणि सचिवांचे मौन बऱ्याच काही सांगत आहे आणि लवकरच पारड्या मागच्या खिलाडी उजागर होईल अशी सूत्रांनी माहिती दिला आहे.
अब तो बंदे बन्दोको बदनाम करने मे लगे है, काम था शैतान का ये काम इन्सान करने लगे है, हुवे है मशरूफ इस कदर लोग गीबतो मे, के शैतान भी बेफिकिर होकर आराम करने लगे है
पुण्यातील, बाणेर ता. हवेली येथील बाणेर मस्जिद प्रकरणी वक्फ मंडळाने घेतलेला ठराव व दिलेला आदेश वादांकित ठरत असल्याचे समोर येत आहे. बाणेर मस्जिदीची नोंद महसूल अभिलेखावर जुना सव्र्व्हे न. ९९ क्षेत्रफळ १९ एकर २२ गुंठे जम ीन मस्जिद इनाम वर्ग-३ ची सन १९३४ पासून असल्याचे दिसून येत आहे. उडणशाह वली दर्गाह ची नोंद धर्मादाय आयुक्त पुणे आणि राज्य वक्फ मंडळाच्या कार्रवाहीतून पुढे आला. आणि इथूनच वक्फ मंडळाची भरभराट सुरू झाली. थेट मंत्रालय कनेक्शन असल्यावर हि उडणशाह वली दर्गाह व बाणेर मस्जिदीची वादांकित प्रकरणाला सुरुवात झालाय. बाणेर मस्जिद प्रकरणात मंडळाने ठराव आणि आदेश घाईगडबडीत पारित करून ज्या बैठकीत दिनांक ११/८/२०२६ रोजी ठराव क्र.२१ मंजूर केला ते इतिवृत्त प्रशासनाने दबावाखाली व प्रकरणाची सत्यता लपविण्याचा दृष्टीने दडपून ठेवलाय वक्फ प्रशासन कार्यकाळ संपल्यानंतर हि सभासदांच्या इशार्यावर काम करत असल्याचे सांगितले जात आहे कोणाच्या फायद्यासाठी, कोणाच्या झोळीत वक्फ मंडळ करोडो रुपयांची ७ हेक्टर ७४ आर जमीन सोपवण्यासाठी इतके प्रयत्न करत होते? बाणेर म स्जिद प्रकरण शासन आणि प्रशासनासाठी डोकेदुखी ठरणार आहे. मुख्यमंत्रीनी यावर लक्ष घालावे व कोणाला लाभ पोहोचविण्याच्या दृष्टीने हे सगळे खेळ रचला गेला हे राज्याच्या जनते समोर यायला हवे.
उडणशाह वली दर्गाह कलम ४३ व धर्मादाय आयुक्त कार्यालय नोंदणीत तफावत ?
बाणेर मस्जिद संदर्भात जी माहिती समोर येत आहे ती आश्चर्यचकित व धक्कादायक ठरणार आहे. हे प्रकरण ज्यापद्धतीने मार्गी लावण्याचा प्रयत्न झालाय त्यामुळे वक्फ प्रशासनाच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. सर्व्ह न. ९९/१ बाणेर मस्जिदीचा १२०० कोटी रुपयांचा जमीन प्रकरणी पारदर्शकतेच्या नावाखाली भ्रष्ट्राचाराचे विष पेरले जात असल्याचे आरोप केले जात आहे. वक्फ मंडळाचे विकासकामांच्या नावाखाली पद्धतशीरपणे स्वतःचा विकास केला जात असून मलाई खाल्ली जात असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने दिनांक ११/०८/२०२६ रोजीच्या बैठकीत ठराव क्र.२१ मंजूर आणि दि. ०२/सप्टेंबर /२०२६ रोजी प्रकरण क्र.५२ अ/१९५/२०२५ मध्ये आदेश पारित केलाय.
यात वाद असे निर्माण झालाय कि बाणेर मस्जिद धर्मादाय आयुक्त पुणे कार्यालयात नोंदणी होती आणि ती कायम असल्याचे तसेच उडणशाह वली दर्गाह बी. ३८२ आणि चौ.अ.क्र.८३३/९० अन्वये ची नोंद धर्मादाय आयुक्त कडून रद्द केली होती. उडणशाह वली दर्गाह बाणेर, ९५४ बाणेर ता. हवेली जि. पुणे श्री अब्दुल लालभाई सय्यद, श्री. इनायत रमझान सय्यद, श्री. हमजान लालभाई सय्यद आणि श्री. रझाक लालभाई सय्यद सर्व रा. बाणेर / श्रीरामपूर नंतर द बाणेर मस्जिद पुणे आदेश एसीसी २ एमएएनओ ५०/१५, एमएएनओ ४६९/१५, एम एएनओ ५३५/१६ त्यानंतर बदल अर्ज न.६२३/९९ दि. २/६/९९ नंतर बदल अर्ज १०५९/१५ दि २७/१०/२०१५ चे नोंद आणि धर्मादाय आयुक्त यांचे हे आदेश पत्र नोंदणी समोर आली यातून असे दिसते कि उडणशाह वली दर्गाहची नोंद अस्तित्वात नाहीत. मग खरी स्थिती काय? हे पाहावे लागेल ...!





प्रतिक्रिया द्या