महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या निर्णय प्रक्रियेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलची २४ मार्च २०२६ रोजी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत अॅड. सय्यद इफ्तेखार सय्यद इनायत हाश्मी (अनुक्रमांक १३५) आणि अॅड. अहमद खान उस्मान खान पठाण (अनुक्रमांक ९९) हे उमेदवार म्हणून सहभागी झाले होते, दोन्ही वक्फ सदस्यांचे बार कौन्सिलमधील प्रत्यक्ष सदस्यत्व संपुष्टात आल्याने त्यांनी वक्फच्या बैठीकीत सदस्य म्हणून उपस्थिती दर्शविलीच नव्हे तर अश्या अनेक ठरावावर हम साथ साथ है म्हणत अध्यक्षाला एकटा पडू न देता या दोन्ही कायदातज्ञ सदस्यांनी स्वाक्षरी हि केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
या ठरावांचे काय महत्व आहे आणि याचा कोणाला लाभ मिळाला व कोणाला मिळणार यावर पारदर्शकतेचा ढोंग रचणाऱ्यांनी व विकासाचे नगारे वाजणाऱ्यांनी राज्याच्या जनते समोर बाणेर मस्जिद आणि उडणशाह वली दर्गाह वक्फ मिळकतीबाबतचा खुलासा करावे अशी नागरिकांची इच्छा आहे. बाणेर मस्जिदचा ठराव क्र. २१ व सीईओचे आदेश आणि उडणशाह वली दर्गाहच्या आदेशांचीही चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री, अल्पसंख्यक व औकाफ मंत्री आणि सचिवांची भूमिका काय हे महत्वाचे ठरणार आहे.
मिळालेल्या माहिती नुसार वक्फ कायदा, १९९५ मधील कलम १४(१) (ब) () नुसार राज्य बार कौन्सिलमधील मुस्लिम सदस्यांना वक्फ मंडळाच्या सदस्यत्वासाठी पात्रतेचा आधार उपलब्ध होतो. याच तरतुदीचा अर्थ स्पष्ट करताना सर्वोच्च न्यायालयाने २२ एप्रिल २०२५ रोजी मोहम्मद फिरोज अहमद खालिद विरुद्ध स्टेट ऑफ मणिपूर या प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, बार कौन्सिलमधील सदस्यत्वाच्या आधारे वक्फ मंडळावर आलेल्या सदस्याचा वक्फ मंडळातील कार्यकाळ हा बार कौन्सिलमधील त्याच्या सदस्यत्वाच्या कार्यकाळाशी संलग्न आहे. बार कौन्सिलचे सदस्यत्व संपुष्टात आल्यास, कायद्यातील संबंधित अर्टीच्या अधीन राहून वक्फ मंडळावरील सदस्यत्वही संपुष्टात येते. त्यामुळे अॅड. सय्यद इफ्तेखार सय्यद इनायत हाश्मी आणि अॅड. अहमद खान उस्मान खान पठाण या दोन्ही वक्फ सदस्यांचे बार कौन्सिलमधील प्रत्यक्ष सदस्यत्व संपुष्टात आल्याने त्यांनी वक्फच्या बैठीकीत सदस्य म्हणून सहभाग व उपस्थित राहण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले जाते.
सर्वोच्च न्यायालयाच्या २२ एप्रिल २०२५ च्या निर्णयाचा आधार, २४ मार्च २०२६ नंतरच्या ठरावांची वैधता तपासण्याची मागणी -
या बाणेर मस्जिद आणि सदस्यत्व प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर २४ मार्च २०२६ नंतर झालेल्या राज्य वक्फ मंडळाच्या बैठकांमध्ये संबंधित सदस्य सहभागी झाले, त्यांनी थारावबाबत चर्चा / मतदान हि केले व ठराव मंजूर हि झाले आणि सर्वोच्च न्यायालयाच्या २२ एप्रिल २०२५ च्या निर्णयाचा आधार व कायद्यानुसार यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने लक्ष देणे गरजेचे होते. २४ मार्च २०२६ नंतरच्या बैठकांमध्ये कोणते महत्त्वपूर्ण ठराव मंजूर झाले, याची तपासणी करण्याची मागणी होत आहे. विशेषतः बाणेर मस्जिदच्या जमिनीशी संबंधित दिनांक ११/०८/२०२६ रोजीचा ठराव क्रमांक २१ यामध्ये संबंधित सदस्यांची भूमिका काय होती, त्यावेळी त्यांचे सदस्यत्व कायदेशीरदृष्ट्या वैध होते का आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कोणत्या आधारावर मंजुरी दिली, हे प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित वक्फ सदस्य अपात्र ठरल्याचे अधिकृतरीत्या सिद्ध झाल्यास त्यांच्या सहभागामुळे प्रभावित झालेल्या ठरावांच्या वैधतेचा शासनाने व वक्फ प्रशासनाने स्वतंत्रपणे कायदेशीर आढावा घेणे आवश्यक ठरणार आहे. सदरच्या सर्व प्रकार व माहिती नुसार दिनांक २४ मार्च २०२६ नंतरचे सर्व ठराव आपोआप अवैध ठरतात, असा निष्कर्ष लावले जात आहे. विशेष म्हणजे, या ठरावाला मंजुरी देणाऱ्या दोन सदस्यांच्या अधिकारांवर आक्षेप घेतला जात असून, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही या ठरावाला संमती दर्शवून स्वाक्षरी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. संबंधित सदस्य व अधिकाऱ्यांनी कोणत्या कायदेशीर तरतुदींच्या आधारे हा निर्णय घेतला, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
बाणेर मस्जिद आणि उडणशाह वली दर्गाह प्रकरण पुन्हा चर्चेत - दैनिक 'लोकनिष्ठ'ने यापूर्वीही बाणेर मस्जिद आणि उडणशाह वली दर्गाहच्या जमिनीशी संबंधित वक्फ मंडळाच्या निर्णय प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. बाणेर मस्जिदच्या ठराव क्रमांक २१ बाबत तसेच उडणशाह वली दर्गाहच्या ठराव आणि आदेशांबाबत कायदेशीर आक्षेप उपस्थित होत आहेत. सूत्रांची माहितीनुसार पुण्यातील बाणेर ता. हवेली सर्व्ह न. ९९/१ क्षेत्र ७ हेक्टर ७४ आर बाजार मूल्य १२०० कोटीपेक्ष जास्त या जमिनीची नोंद द बाणेर मस्जिद असे महसूल अभिलेखात असल्याचे दिसून येते. या जमिनी बाबत असे आरोप होत आहे कि, काही व्यक्तींना ही जमीन हवी आहे, ती कोणत्याही मार्गाने मग तो मार्ग चुकीचा असो किंवा भ्रष्टाचाराचा, ती बळकावण्याचा प्रयत्न करत आहे. यात सरकारी अधिकारीही सामील असून त्यांना पाठिंबा देत आहेत. मात्र, सरकारी यंत्रणा आणि वक्फ मंडळ दोघेही यात अपयशी ठरले आहेत; सन १९३४ पासून सदर जमीन बाणेर मस्जिदच्या नावाने नोंद आहे. कारण मशिदीची स्वतःची शासकीय कागदपत्रेच भक्कम पुरावा आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करणे शक्य नाही. उडणशाह वली दर्गाहच्या प्रकरणात मंत्रालयीन स्तरावरून दबाव आणला जात असल्याची माहितीही चर्चेत आहे. या प्रकरणात मंत्रालयीन स्तरावर कोणत्या अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला, कोणत्या कारणासाठी निर्णय प्रक्रियेत सहभाग घेतला व दबाव होता आणि संबंधित जमिनीच्या व्यवहारांशी कोणाचे हितसंबंध जोडलेले आहेत का, याची पारदर्शक चौकशी होण्याची मागणी होत आहे.
व्यावसायिकांच्या हितासाठी निर्णय घेतल्याचा संशय?
इतक्या मोठ्या बाजारमूल्याच्या वक्फ जमिनीबाबत घेतलेल्या निर्णया मुळे काही व्यावसायिकांना फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न झाला आहे का, असा संशय व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणात अधिकारी आणि संबंधित सदस्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात असून, ठरावामागील नेमका उद्देश काय होता, याचा खुलासा होणे गरजेचे आहे.
राज्य सरकार गप्प का? शासन आणि प्रशासनाने खुलासा
करावा! राज्य वक्फ मंडळातील कथित मनमानी कारभार आणि निर्णय प्रक्रियेतील अनियमिततेबाबत आता राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी होत आहे. अल्पसंख्याक समाजाच्या धार्मिक मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेतच अशा प्रकारचे वाद निर्माण होत असतील, तर त्याची जबाबदारी निश्चित करणार कोण? राज्य वक्फ मंडळाच्या सदस्यांची पात्रता, बैठकीतील उपस्थिती, मतदानाचे अधिकार आणि मंजूर ठरावांची कायदेशीर वैधता याबाबत राज्य सरकारने स्पष्ट भूमिका मांडणे आवश्यक आहे.
संबंधित दोन्ही वकिलांच्या बार कौन्सिलमधील सदस्यत्वाची अधिकृत स्थिती जाहीर करावी. २४ मार्च २०२६ नंतरच्या बैठकींचे इतिवृत्त आणि संबंधित ठरावांची तपासणी करावी. बाणेर मस्जिद आणि उडणशाह वली दर्गाह प्रकरणातील सर्व आदेशांची स्वतंत्र कायदेशीर तपासणी करावी, अशी मागणी पुढे येत आहे. अखेर प्रश्न एकच आहे वक्फ मंडळाचे निर्णय कायद्याच्या चौकटीत घेतले जात आहेत की सदस्यांच्या पात्रतेबाबतच प्रश्न निर्माण होत आहेत? बाणेर मस्जिदपासून उडणशाह वली दर्गाहपर्यंतच्या प्रकरणांमधील सत्य समोर येणार का? आता राज्य सरकारने मौन सोडून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडण्याची गरज आहे. आता पाहू पुढे सरकार आणि औकाफ मंत्रालय काय भूमिका मांडते ...!





प्रतिक्रिया द्या