छत्रपती संभाजीनगर / पुणे (दैनिक लोकनिष्ठ ) - महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या मनमानी कारभार व बेकायदेशीर ठराव व चुकीच्या आदेशामुळे वक्फ प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न निर्माण उपस्थित होत आहे. वक्फ मंडळाच्या सभासदांनी मनमानी पद्धतीने बेकायदेशीर ठरावांना मंजुरी दिल्याचे प्रकरण दैनिक लोकनिष्ठ ने उघड करून शासन आणि राज्याच्या जनते समोर आणून ठेवलाय.दैनिक लोकनिष्ठ ने यापूर्वी वक्फ मंडळ बैठकीचे इतिवृत्त दडपून संकेतस्थळावर सार्वजनिक केले नाहीत हे प्रकार समोर आणले होते. इतिवृत्त दडपण्यामागचे कारण आता हळू हळू उघड होत चालले आहे आणि वक्फ मंडळाचे पारदर्शकतेचे दावे चुकीचे ठरत आहे. गेल्या पांच वर्षाच्या कार्यकाळात वक्फ मंडळाच्या मालमत्तांचे संरक्षण कसा झाला व अनियमितता व घोटाळे कसे झाले हे राज्यात सध्या चर्चेचा विषयी झाला आहे. पुण्यातील बाणेर मस्जिद प्रकरणात अनियमितता व घोटाळा समोर आला आहे. दैनिक लोकनिष्ठने हे प्रकार समोर आणले होते त्याची दखल आता राज्य सरकारने घेतली आहे. चौकशी आणि पत्रकारांची सुरक्षा हि महत्वाची आहे.सरकार प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे विकासकामांचा व पारदर्शकतेचा ढोंग करणाऱ्यांना आता घाम फुटणार आहे. प्रश्न असा उपस्थित केले जाते कि, बाणेर मस्जिद असो कि उडणशाह वली दर्गाह दोन्ही वक्फ संस्था आहे. कलम ४३ अन्वये जे प्रकरण महत्वाचे आहे त्याला महत्व का दिले नाही. बाणेर मस्जिद का नको यामागचे गूळ नेमके काय आहे लवकरच समजेल .पण बाणेर मस्जिद आणि उडणशाह वली दर्गाहचा जे ठराव व आदेश पारित करण्यात आला आहे त्याला न्यायच्या दुर्ष्टीने स्थान नाही.सध्या राज्य सरकार कडून वक्फ मंडळ नियुक्तीचा विचार होत आहे त्यावर मंडळावर नियुक्तीसाठी इच्छुक आप आपल्या पद्धतीने जोर लावत आहे. मंत्रालयात वक्फ मंडळावर नियुक्तीची जोरदार हालचाली हि सुरु झाल्याची चर्चा आहे.वक्फ मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष हि पुन्हा या रेस मध्ये असल्याचे चित्र दिसून येत आहेत आणि काही मंडळीही त्यांच्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे. आता राज्य सरकार काय भूमिका मांडतील हे पाहावे लागणार आहे.
बाणेर मस्जिद कथित घोटाळ्याच्या बातमीची दाखल सरकारने घेतली !
वक्फ मंडळाच्या गलथान कारभाराने वक्फ मंडळाचा बोजवारा करून ठेवल्याचे सांगितले जात असले तरी पुणे, बाणेर मस्जिदची १२०० कोटींची जमिनीबाबत वक्फ मंडळ आणि वक्फ अधिकाऱ्यांनी रचलेल्या खेळात ते स्वतःच्याच सापळ्यात अडकत आहे .बाणेर मस्जिद ठराव आणि आदेश हा मंत्रालयातून दबाव व तोंडी शिफारसच्या आधारे करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.मंत्रालयातून बाणेर मस्जिद प्रकरणात कोणाचा दबाव होता आणि कोणाला लाभ मिळविण्याच्या हेतूने व मंत्रालयातील अधिकारींचे दबावाखाली वक्फ मंडळाने व मुख्य कार्यकारी अधिकारीने चुकीचा ठराव/ आदेश पारित केला ?मशिदीची जमीन बळकावू पाहणाऱ्या व्यक्तीला फायदा करून देण्यासाठी वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून एक चुकीचा आदेश पारित झाला आहे. १२०० कोटींची जमीन कोणाला हवी आहे ?कित्येक वर्षांपासून जमिनीसाठी खेळ खेळलंय जातंय आता मंत्रालयातून दबाव आणून जमीन हडप करण्याची योजना असल्याची माहिती मिळाली आहे. मंत्रालयातून हा खेळ सुरु असला तरी याची माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रियांना व मंत्र्यांना आहे का ? आहेत तर राज्य सरकार यावर काय कारवाही करणार आहे याकडे लक्ष लागले आहे.
आखिर तो करेगा भी क्या कोई पीर फ़कीर इन लोगों का सोया होतो जग भी जाए मर गया है ज़मीर इन लोगों का
अधिकाऱ्यांच्या संगनमतातून व्यावसायकांना फायदा मिळवून देण्याचा खेळ !
मिळालेल्या माहितीनुसार वक्फ मंडळाच्या बैठकीत दिनांक ११/८/२०२६ रोजीचा ठराव क्र.२१ वादांकित ठरत असून त्यात मोठी मासे व वक्फ मंडळाचे तत्कालीन सभासद व वक्फ अधिकारी अडकणार असल्याची शक्यता आहे. बाणेर मस्जिद ठराव क्र.२१ हा बेकायशीर ठरणार या बेकायदेशीर ठरावावर ज्या दोन सदस्यांनी मंजुरी व स्वाक्षरी केलाय त्यांना अधिकारच नाही असे असतांना देखील मुख्य कार्यकारी अधिकारींनी हि आपली संमती दाखविले व स्वाक्षरी केलाय .जे कि हे कायदा व नियमांचे उल्लंघन आणि सर्वाच्च न्यायालयाच्या आदेशाचे अवमान हि आहे. ठराव व निर्णय कोणाच्या हितासाठी झालाय ?राज्य वक्फ मंडळात मनमानी कारभार व घोटाळे सुरु असून राज्य सरकार मूग गिळून का बसलेत ? अल्पसंख्यक व औकाफ मंत्री सुनेत्रा अजितदादा पवार याकडे का दुर्लक्ष करत आहे. चुकीच्या ठराव व आदेशांवर कारवाही होणार कि प्रकरण 'तेरी भी चूप और मेरी भी चूप होणार ? बाणेर मस्जिद ठराव व आदेशाची चौकशीची मागणी पुढे आली आहे. दैनिक लोकनिष्ठ वक्फच्या मनमानी कारभार व अनियमितता आणि घोटाळ्यांचे सातत्याने वाचा फोडण्याचे काम करत आहे आणि वक्फ मंडळ दोषियांना वाचविण्याचे आणि प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत राहिला मात्र कितीही प्रयत्न झाले तरी प्रकरण उघड होत राहील .वक्फ बैठकीच्या इतिवृत्त दडपणाऱ्या वक्फ बैठक विभाग प्रमुखाला आता पर्यंत का निलंबित केले नाही ? शासनाच्या आदेशाने इतिवृत्त दडपलंय गेले का ?वक्फ बैठक विभाग प्रमुखाला शासनाचा आशीर्वाद आहे का ? वक्फ बैठक विभाग प्रमुखाला वाचविण्याचे मंत्रालयातून दबाव आहे का ? याचा खुलासा करावा वक्फ प्रशासन का गप्प बसले. याचा जाब विचारण्याचा अधिकार समाजाला आहे.
भ्रष्ट अधिकाऱ्यांना अभय कोणाचा !
पुण्यातील, बाणेर मस्जिद, बाणेर ता. हवेली जुना सर्व्हे न. ९९ क्षेत्रफळ ७ हेक्टर ७४ आर जमीन म्हणजे, १९ एकर २२ गुंठे जमीन, मूल्य अंदाजे १२०० कोटी,मस्जिद इनाम वर्ग -३ ची सन १९३४ पासून बाणेर मस्जिदच्या नावाने नोंद असल्याचे दिसून येत आहे.या जमिनीवर एका खास व्यक्तीची नजर बऱ्याच वर्षांपासून आहे. त्याव्यक्तीने अनेक प्रयत्न अनेक जुगाड लावलाय धर्मादाय आयुक्त पासून वक्फ मंडळापर्यंत नंतर मंत्रालय ते वक्फ मंडळापर्यंत जोर लावल्याचे पुढे आले आहे. वक्फ मंडळावर मंत्रालयातून दबाव आणल्या गेल्याने बाणेर मस्जिद प्रकरणी ठराव व आदेश पारित करून उडणशाह वली दर्गाहच्या खेळ खेळला गेला. धर्मादाय आयुक्त पुणे मध्ये उडणशाह वली दर्गाह नोंद कधी होती .नोंद करणाऱ्यांना काय अधिकार याची चौकशी हि गरजेचे असल्याचे सांगितले जाते. उडणशाह वली दर्गाहची नोंद कलम ४३ अन्वये धर्मादाय आयुक्त कार्यालयकडून आली होती का वक्फ मंडळाने कलम ४३ अन्वये नोंदणी केली होती का ?कलम ४३ अन्वये कोणती संस्था वक्फने नोंदणी केली उडणशाह वली दर्गाह
कि बाणेर मस्जिद याचा खुलासा प्रशासन करणार का ?वक्फ अधिकाऱ्याने बेकायदेशीर खरेदी विक्री व्यवहार रद्द केले हि एक चांगली गोष्ट झाली पण बाणेर मस्जिदची नोंद का रद्द केली ? उडणशाह वली दर्गाहची नोंदणी करणे बाबत वक्फ अधिनियम १९९५ चे कलम ४३ अन्वये धर्मादाय आयुक्त यांच्या कडून प्रस्ताव किंवा आदेश आहेत का ? द बाणेर मस्जिद कलम ४३/४६ वक्फ अधिनियम १९९५ अन्वये ४९५६/०५.दि.१८/८/२००५ नवीन नोंदणी क्र.४८७२/२००५ नुसार नोंदणी प्रमाणित करण्यात आलेली आहे. तसेच वक्फ कायदा, १९९५ च्या कलम ३६ अंतर्गत वक्फ नोंदणीसाठीचा अर्ज. वक्फ संस्थेचे नाव: मशीद बाणेर, ता. हवेली, जि. पुणे. नोंदणी आणि दिनांक. वक्फचे नाव आणि पत्ता: बॉम्बेचे महामहिम गव्हर्नर यांनी १८७० च्या आदेश क्र. ९८६ अन्वये ही जमीन मशिदीच्या सेवेसाठी प्रदान केली होती.
सुन्नी वक्फ. क्षेत्रफळ: ०७ हेक्टर ७४ आर. या माहितीसह नोंदणी करण्यात आली आहे.आणि हि माहिती वक्फ मंडळ कार्यालयात नोंदणी आहेत .
वक्फ मंडळाने मंजूर केलेले ठराव/आदेश अवैध ठरविले जातील...!
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलची निवडणूक २४ मार्च २०२६ रोजी पार पडली. या निवडणुकीत ॲडव्होकेट सय्यद इफ्तेखार सय्यद इनायत हाश्मी (अनुक्रमांक १३५) आणि ॲडव्होकेट अहमद खान उस्मान खान पठाण (अनुक्रमांक ९९) हे उमेदवार होते.वक्फ कायदा, १९९५ आणि वक्फ (सुधारणा) कायदा, २०२५ च्या तरतुदीनुसार (कलम १४), महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डावर 'बार कौन्सिल'मधून नियुक्त व्यक्तींचे सदस्यत्व हे त्यांच्या 'बार कौन्सिल'मधील सदस्यत्वाच्या कालावधीपर्यंतच मर्यादित असते.बार कौन्सिल निवडणुकीत उमेदवार बनल्यानंतर संबंधित व्यक्तीची सक्रिय सदस्यत्वाची स्थिती बदलते; अशा परिस्थितीत त्यांनी वक्फ बोर्डातील पद भूषवणे किंवा निर्णय प्रक्रियेत सहभागी होणे सुरू ठेवू नये. सर्वोच्च न्यायालयाच्या २२ एप्रिल २०२५ रोजीच्या आदेशानुसार, बार कौन्सिल निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहणे किंवा बार कौन्सिलमधील सक्रिय सदस्यत्व संपुष्टात येणे, यामुळे संबंधित व्यक्ती वक्फ बोर्डावर राहण्यास अपात्र ठरते.कायदा व नियम आणि सर्वोच्च न्यालयाच्या आदेश/उद्धरण या प्रमाणे २४ मार्च २०२६ नंतरच्या सर्व ठराव व आदेश बेकायदेशीर व अवैध ठरणार आणि दोषियांविरुद्ध कारवाही होण्याची दाट शक्यता आहे. " दैनिक लोकनिष्ठ " वारंवार वक्फ मंडळाच्या भ्रष्ट व मनमानी कारभाराचे भांडाफोड करत आहे पण शासन आणि प्रशासनाची लाचारी असल्याचे दिसून येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे बाणेर मस्जिद आणि उडणशाह वली दर्गाह चे आदेश वादांकित ठरणार असल्याचे दैनिक लोकनिष्ठ ने यापूर्वीच सांगितले होते. बार कौन्सिल निवडणुकीत उमेदवार बनल्यानंतर संबंधित व्यक्तीची सक्रिय सदस्यत्वाची स्थिती बदलते त्यामुळे ॲडव्होकेट सय्यद इफ्तेखार सय्यद इनायत हाश्मी आणि ॲडव्होकेट अहमद खान उस्मान खान पठाण वक्फच्या बैठकीसाठी हे सदस्य अयोग्य आहे म्हणून ठराव क्र.२१ हि अयोग्य असल्याने कायद्याच्या दुर्ष्टीने रद्द होण्याची शक्यता आहे. उडणशाह वली दर्गाह चा ठराव व आदेशाबाबत दबाव व जोर मंत्रालयामधून लावले जात असल्याची माहिती समोर येत आहे . उडणशाह वली दर्गाह वक्फ जमिनीचे मंत्रालय कनेक्शन काय आहे आणि हे कनेक्शन मागचे रहस्य आणि योजना काय आहे हे पुढे येत आहे ...! कुछ तो गडबड है !





प्रतिक्रिया द्या