छत्रपती संभाजीनगर(लोकनिष्ठ) - छत्रपति संभाजीनगर शहरात सध्या जमीन घोटाळे, जमीन व्यवहारात फसवणूक, शासकीय जमिनी हडपकरण्याचे प्रयत्न अशी अनेक प्रकरणे उघडकीस होत आहे या सर्व प्रकरणात शासकीय अधिकाऱ्यांची संगमात, भ्रष्टाचार असल्याचे हि प्रकार समोर येत आहे. महसूल विभागातील भ्रष्ट्राचार सध्या राज्यात वेगाने वाढत चालला आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे दररोज महसूल खात्यात नवीन योजना नागरिकांच्या सवलतीसाठी घेऊन येत आहे. मात्र महसूल खात्याला जे भ्रष्ट्राचाराचे कीड लागलेले आहे त्यावर आतापर्यंत काहीही उपयोजना किंवा काही ठोस निर्णय घेण्याचे प्रत्यन झाल्याचे दिसून येत नाही. ज्यामुळे आता राज्यात शासकीय जमिनी सुरक्षित राहिलेली नाहीत असे समोर येत असलेल्या प्रकरणांमधून स्पष्ट दिसून येत आहे. सध्या शहरातील हिमायतनगर, हिमायतबाग सव्हें न. २२ ची ७ एकर २ गुंठे कोट्यवधी रुपयांची वादग्रस्त जमीन कायदेशीररित्या कशी नोंदविले जाईल याचा प्रत्यन सध्या जोरात सुरु असल्याची माहिती मि ळालेली आहे. हिमायतबाग सर्व्ह न. २२ जमिनीबाबत खरेदीखत, मुखत्यारनामाच्या आधारे मालकी हक्काचे दावे झाल्यामुळे ही जागा वादग्रस्त ठरली आहे. जागेचा मालकीहक्काबाबत वाद महसूल अधिकाऱ्यांचे डोकेदुखी ठरले आहे.सूत्रांकडून माहिती मिळाली. सर्व्हे न. २२ हिमायतबाग वादांकित जमिनीचा वाद हा काही नवीन नाहीत.
मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडे वादांकित जमीन हस्तांतरित झाली होती. मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी फळ संशोधन केंद्र हिमायतनगर औरंगाबाद (सध्या छत्रपती संभाजीनगर) चे नाव महसूल अभिलेख सातबारा उताऱ्यावर नोंद झालेली आहे. नवाब मीर उस्मान अली खान निझाम सात वे हैदराबाद यांचा व मीर जुल्फेखार जाह आणि मुखत्यार आम साहेबजादा शरार रिझवानी पिता सय्यद हुसेन यांच्या नावाने दीर्घकाळानंतर महसूल प्रशासनासमोर दावे संशयित असल्याकारणाने त्यांची सखोल चौकशी होत असल्याची माहिती मिळालेली आहे. हिमायतनगरची वादांकित जमीन प्रकरण गुंतागुंतीत सापडत असल्याची चर्चा अपर तहसीलदार छत्रपती संभाजीनगर आणि उपविभागीय अधिकारी छत्रपती संभाजीनगर कार्यालयात सुरु आहे. अपर तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी छत्रपती संभाजीनगर कार्यालयात प्रकरणे दाखल करून मार्गी लावण्याचे प्रत्यन होत असल्याने प्रकरणाचे कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली आहे. मालकीहक्काचे दावे प्रकरणातील अपर तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी छत्रपती संभाजीनगर कार्यालयात दाखल कागदपत्रांच्या पडताळणी नंतर प्रकरणी बर्याचशी गोष्टी उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अपर तहसीलदार छत्रपती संभाजीनगर यांच्या कडे कलम १५५ अन्वये आणि नामांतराचे प्रकरण आणि उपविभागीय अधिकारी छत्रपती संभाजीनगर कार्यालयात महाराष्ट्र संहिता १९६६ चे कलम २४७ अन्वये अपील दाखल असल्याची माहिती आहे प्रकरणी निर्णयासाठी अधिक प्रयत्न असल्याचे सांगितले जाते. दैनिक लोकनिष्ठ मध्ये बातमीया येत असल्याने काही लोकांमध्ये नाराजगी पसरलेली आहे तर काहींनी हे चांगले नाहीत असे म्हटले आहे पण जे आहे ते आहे रेकॉर्ड वर खरी माहिती यायला हवी. शासन आणि प्रशासन वेळीच दाखल घेत नसल्याने भ्रष्ट्राचार घोटाळे झाल्यानंतर शासन आणि प्रशासनाचे डोळे उघडतात. अशी परिस्थिती याप्रकरणी होणार तर नाही ना याकडे महसूलमंत्री व कृषिमंत्री देतील अशी अपेक्ष ठेवणे काही गैर नाहीत. आता या प्रकरणी शासन आणि महसूल प्रशासन काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे...





प्रतिक्रिया द्या