छत्रपती संभाजीनगर (दैनिक लोकनिष्ठ - युनूस खान ) महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळच्या मनमानी व भ्रष्ट उघड होत असतांना राज्य सरकार आणि राज्य अल्पसंख्याक व औकाफ मंत्रालय सचिवांची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांपासून बैठकीचे इतिवृत्त शासकीय संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले नाहीत. अपलोड न करणाऱ्या अधिकारींना शासन आणि प्रशासन पाठीशी घालण्याचे प्रयत्न करीत असल्याने त्याच्या विरुद्व काहीच कारवाही करण्यात येत नसल्याचे आरोप होत आहेत. इतिवृत्त दडपण्यामागचे कारण अनेक असू शकते हे वेगळे सांगण्याची गरज नाहीत .मात्र यावर राज्य सरकार गप्प का बसले नेमके कारण काय असा प्रश्न उपस्थित केले जात आहे. राज्यात 500 कोटींचे आरोप प्रत्यारोपवार मुख्यामंत्र्यांनी चौकशी समिती नेमली मात्र वक्फच्या घोटाळ्यांवर चौकशी कारवाही कधी होणार असे प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
वक्फ मंडळात बैठकीच्या इतिवृत्त सार्वजनिक झाल्यास अनेक घोळ व अनियमितता उघड होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. इतिवृत्त दडपण्यामागे झालेल्या घोटाळ्यांना संरक्षण देणे असल्याची चर्चा कार्यालयात सुरु आहेत. मंडळाचे कार्यकाळ संपला असला तरी सभासदांचे कार्यालयात काही खबरी अधिकारी सभासदांच्या संपर्कात असून दररोजची माहिती सभासदांना पुरविते असल्याचे कार्यालयात बोलले जात आहे.
वक्फ कार्यालयात इतिवृत्तच नव्हे तर अनेक लाभकारी फाईली हि दडपण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. मिळालेल्या माहिती नुसार बीडच्या प्रकरणे विशेष करून दडपण्याचा खेळ सध्या जोरात सुरु आहे. महत्वाचे म्हणजे बीडच्या जमिनींबाबतच्या काही प्रकरणांमध्ये पत्रव्यवहार व भेटीगाठी सुरु असल्याने फाईली मार्गी लावण्याची हालचाली सुरु असल्याचे सांगितले जात आहे. वक्फ जमीन घोटाळे, नियुक्ती, पदौन्नती,बेकायदेशीर आदेश, भरती प्रक्रिया,खाजगी कॉन्ट्रॅक्टर मार्फत भरती, ना हरकत प्रमाणपत्रे,अशी अनेक प्रकरणे चौकशीच्या दायऱ्यात सापडतील ज्याची चौकशीची मागणी होत आहे.तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यकाळातील अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट झाले आहेत तर काही प्रकरणांमध्ये अनियमितता झालाय तर काही प्रकरण मागे घेतल्याची हि माहिती समोर येत आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी आणि फाईव्ह स्टार हॉटेल ची व्यवस्था हे कसे काय ? या सर्व भोंगळ कारभारावर शासन काय भूमिका मांडणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.





प्रतिक्रिया द्या