छत्रपती संभाजीनगर (दै. लोकनिष्ठ)
छत्रपती संभाजीनगर शहरात जमीन घोटाळे, बोगस खरेदीखत, खोट्या कागदपत्रांच्या आधारे खरेदी- विक्री आणि फसवणुकीचे प्रकरण वाढत चालले आहे. महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनासाठी जमिनीचे घोटाळे आणि वादविवाद डोकेदुखी ठरले आहे. महसूल विभागात अशी अनेक घोटाळे वादविवाद, फसवणुकीचे प्रकरण चौकशी च्या फेऱ्यात अडकलेले आहे तर अनेक प्रकरणी भ्रष्ट शासकीय अधिकारी या घोटाळ्यामध्ये गुंतलेले असल्याने प्रकरण चौकशी कार्यवाहीच्या प्रतीक्षेत आहे.
कथित जमीन घोटाळ्यात भूमाफियांना साथ देणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना राज्य सरकार व उच्च न्यायालयाने अनेक वेळ मोठा झटका दिले आहे तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कडक शब्दात कोणाचीही गया केले जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे असे असतांना हि देखील महसूल विभागातील भ्रष्ट्राचार व घोटाळे सर्रास होत असल्याची माहिती समोर येत आहे. मौजे हिमायतनगर छत्रपती संभाजीनगर येथील हिमायतबाग गट न.२२ क्षेत्रफळ ७ एकर २ गुंठे जमीन (जुने नाव मोहम्मदीया बाग) शासकीय ताब्यातून बेकायदेशीर रित्या हडप करण्याची हालचाली जोरात सुरु असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. महसूल विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना खोट्या व चुकीच्या माहितीच्या आधारे संगनमताने राजकीय बळाच्या जोरावर शासकीय जागा हडपण्याचे षडयंत्र सुरु आहे. होत असलेल्या जमीन घोटाळे, माफियाराजविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाईची नितांत गरज आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम शासकीय जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण केल्यास दंडात्म क कारवाई आणि महाराष्ट्र नियंत्रण व संघटित गुन्हेगारी कायदा संघटितपणे गुन्हे करून जमिनी बळकावणाऱ्या टोळ्यांवर 'मोका' अंतर्गत गुन्हे दाखल होतात। अनेक राज्यांत सरकारी जमिनीवरील भू माफियांचे अवैध बांधकाम थेट बुलडोझरने जम ीनदोस्त केले गेले आहे. मौजे हिमायतबाग छत्रपती संभाजीनगर येथील गट न.२२ क्षेत्रफळ ७ एकर २ गुंठे जमीन प्रकरणात कृषी विभागाची काय भूमि का आहे या जमिनीचे वादविवाद आणि मालकी
हक्काबाबत चे महसुली अभिलेख आणि जमिनीवरील दावे हे संशयी असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी कटकारस्थान रचले जात असल्याचे हि माहिती मिळत आहे. ज्याची सखोल पडताळनी शासनाने आपल्यास्तवर केल्यास अधिक स्पष्टता प्रकरणी समोर येईल असे दिसून येते.
गट न.२२ क्षेत्रफळ ७ एकर २ गुंठे हिमायतबाग जमीन बाबत मीर उस्मान अली खान यांचे विषयी योग्य पडताळणी आवश्यक आहे आणि वारसदार यांचे आणि कृषी विभागाचे या जमिनीचे संबंध उघड होतील यात शंका नाही. जुने महसूल अभिलेखानुसार मीर उस्मान अली खान यांचे हिमायतबाग गट न.२२ च्या बऱ्याच महसूल अभिलेखात नाव नोंद
नसल्याचे किंवा त्यांच्या कोणी वारस असल्याचे दिसून येत नाही. या वादांकित जमीन प्रकरणी कृषी विध्यापीठ परभणी व छत्रपती संभाजीनगर विभाग मौन भूमिका धारण करीत असल्याचे सांगितले जात आहे कृषी विभाग चा या जमिनीवर किती काळापासून ताबा आहे आणि आज कृषी विभागाला मौन बसण्याची वेळ राजकीय दबावामुळे आली आहे का ? राजकीय दबाव मुळे या प्रकरणी महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी व कृषी विभागाच्या अधिकारी प्रतिक्रिया देण्याचे टाळत आहे. मौजे हिमायतबाग गट न.२२ क्षेत्रफळ ७ एकर २ गुंठे जमीन बळकावण्याचे कटकारस्थान सध्या जोरात सुरु आहे. गट न. २२ जमीन प्रकरणी अपर तहसीलदार आणि उप विभागीय अधिकारी या दोन्ही विभागात सुरु असलेले प्रकरण शासकीय जमीनीशी संबंधित असल्याचे रेकॉर्ड वरून सिद्ध होतात. शासकीय जमीन कृषी विद्यापीठ परभणी आणि छत्रपती संभाजीनगर यांच्याशी संबंधित असल्याचे जुने रेकॉर्ड मध्ये स्पष्ट दिसून येत असल्याकारणाने घाईगडबडीत प्रकरणी अपर तहसीलदार व उप विभागीय अधिकारी यांना अपूर्ण माहितीच्या आधारे जमीन लाटण्याचे खेळ संगम ताने सुरु असल्याची माहिती समोर आलेली आहे. या प्रकरणात अपर तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांच्या कडून दोन्ही प्रकरणात अर्धवट माहिती प्रमाणे फाईल मंजूर करून घेण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता या प्रकरणी प्रशासन काय भूमिका मांडत आहे हे पहावे लागेल...





प्रतिक्रिया द्या