trending_up TRENDING:

वक्फ मंडळाच्या सभेत काय काय घडले गुलदस्त्यात, अधिकाऱ्यांनी बैठकीच्या इतिवृत्त लपविले ? हा कसला वक्फ मंडळाचा पारदर्शक कारभार!

person
वक्फ मंडळाच्या सभेत काय काय घडले गुलदस्त्यात, अधिकाऱ्यांनी बैठकीच्या इतिवृत्त लपविले ? हा कसला वक्फ मंडळाचा पारदर्शक कारभार!

छत्रपती संभाजीनगर (दैनिक लोकनिष्ठ - युनूस खान ) महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या भोंगड कारभारावर राज्य शासनाचे दुर्लक्ष आणि अल्पसंख्याक व औकाफ सचिवांची 'तेरी भी चूप मेरी भी चूप' ची भूमिका संशयास्पद असल्याचे सध्याचे चित्र आहे. वक्फ मंडळाच्या कारभारात पारदर्शकतेचे ढोंग उघड होत चालले आहे.मुख्यमंत्री देवभाऊने जर मनावर घेतल्यास मोठया प्रमाणावर घोटाळे अनियमितता उघड होईल व अनेकांना जेल वारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वक्फ बोर्डच्या कार्यालयात चालय काय ? गेल्या तीन वर्षात मंडळाच्या बैठकीया झालाय, बऱ्याच निर्णय आदेश, ठराव मंजूर झालाय तर लीज भाडेपट्टा करार आणि जे १९९५ महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ स्थापन झाल्या पासून झाले नाही ते या पांच वर्षात मनमानी पद्धतीने झालाय त्यात वक्फ मंडळाचे विकास तर झाले नाहीत व उत्पन्न हि वाढले नाही उलट वक्फ च्या कोट्यवधीची जमिनी वक्फ मंडळाच्या हातातून निसटल्याने वक्फ मंडळाचे कोट्यवधीचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.वक्फ मंडळाचे नुकसान झालाय तर त्याचा लाभ कोणाला मिळाला हा एक प्रश्न उपस्थित केले जात आहे. या प्रश्नांचे उत्तर व खुलासा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याकरिता मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. तसेच इतिवृत्त लपविणाऱ्यांविरुद्ध शासन कारवाही कधी करणार ?


एकीकडे वक्फ मंडळाच्या सभासद त्यांच्या कार्यकाळात पारदर्शक काम केल्याचे दावे करत आहेत. मात्र, त्यांच्याच कार्यकाळातले बैठकीचे इतिवृत्त (मीटिंग चे मिनिट्स )आदेश मंजूर ठराव, ना हरकत प्रमाणपत्र, भाडेपट्टा लीजडीड, नॉन वक्फ केलेली वक्फ मिळकत बाबत पारदर्शकता का दाखविले गेले नाही.बैठकीचे इतिवृत्त (मीटिंग चे मिनिट्स )आदेश,मंजूर ठराव,ना हरकत प्रमाणपत्र,भाडेपट्टा लीजडीड,नॉन वक्फ केलेली वक्फ मिळकतीचे आदेश सार्वजनिक का करण्यात आले नाही. २०२३ पासून ऑक्टोबर २०२६ पर्यंत वक्फच्या संकेतस्थळावर बैठकीच्या इतिवृत्त आदेश प्रसिद्ध करण्यात आलेले नाहीत. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व सध्या अल्पसंख्याक व औकाफ मंत्रालयात कक्ष अधिकारी पदावर कार्यरत सय्यद जुनैद व मंडळाच्या सभासदांनी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करून मनमानीपद्धतीने इतिवृत्त सह पारित आदेशांना दाबण्याचे षड्यंत रचल्याची माहिती समोर येत आहे. वक्फ कार्यालयातील बैठक विभागाचे प्रमुख व अधीक्षक या षडयंत्रामागे शामिल असल्याने बैठक विभाग प्रमुख यांनी सभासदांच्या आशीर्वादाने इतिवृत्त सार्वजनिक केले नाही आणि वक्फ मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एवढ्या मोठा घोळ व शासन व नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या बैठक विभागाच्या अधिकारी विरुद्ध कायद्याने कारवाही करण्याऐवजी त्या अधिकारीला वाचविण्याचे कार्य होत असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, वक्फ मंडळाच्या संकेतस्थळावर २०२३ पासून २०२६ पर्यंतची अंतिम झालेल्या बैठकीचे मिनिट्स देखील पोर्टलवर अपलोड करण्यात आलेले नाहीत. मग नेमक्या कोणत्या आधारावर वक्फ मंडळाचे सभासद पारदर्शकतेच्या गप्पा मारतात, असा संतप्त प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. सभासदांना गेल्या तीन वर्षांपासून इतिवृत्त व आदेशांना संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जात नाही याची माहिती व कल्पना नाव्होती का ? बैठक विभाग अधिकारी काय करते याचीही माहिती सभासदांना का झाली नाहीत. एका बैठकीनंतर दुसऱ्या बैठकीच्या वेळी इतिवृत्त व मंजूर ठराव आदेश कायम करण्यात येते अशी तरतूद आहे. मंजूर ठराव व इतिवृत्त आदेश कायम करण्याची ठराविक मुद्दत असते मात्र गेल्या तीन वर्षपासून इतिवृत्त कायम केले गेले नाही किंवा जाणूनबुजून प्रसिद्ध केले गेले नाही गेल्या तीन वर्षात बैठकीचे मंजूर ठराव इतिवृत्त, आदेशांना प्रसिद्धी दिली गेली नाही व सार्वजनिक केले नाहीत त्यामुळे त्याला कायदेशीर मान्यता मिळते का ? कायद्यानुसार त्या सर्व मंजूर ठराव इतिवृत्त व आदेशांना रद्द करणेबाबत याची न्यायालयीन चौकशी गरजेची असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.सभेच्या बैठकीचे मिनिट्स कोणी दडपले त्याचा विरुद्ध कारवाही करण्याची हिम्मत कोणी का करत नाही याचा खुलासा झाला पाहिजे अशी मागणी होत आहे. 


 वक्फ जमिनीच्या व्यवहारातील पारदर्शकतेवर सध्या मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वक्फ अधिनियमाच्या तरतुदीनुसार व इतिवृत्त प्रसिद्ध न करणे, दडपले प्रकरणी कायदेशीर कर्तव्य पालनात कसूर करणाऱ्या मंडळावर कारवाई करण्याचे अधिकार शासनाला आहेत. मग अधिकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी का नाही ? नागरिकांनी शासन आणि प्रशासना पुढे थेट सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे शासनाने व वक्फ मंत्रालय यांनी आता कठोर पावले उचलत तातडीने कारवाई करावी,अशी मागणी होत आहे. इतिवृत्त दडपणाऱ्यांविरुद्ध शिस्त भंग कारवाही करून तात्काळ निलंबित करणे व रीतसर गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी आम्ही केलेली आहे. कारवाही झाली नाहीस तर मा.न्यायालयात दाद मागितले जाणार आहे. आता शासन आणि प्रशासन काय भूमिका मांडते व काय निर्णय घेते याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.


वक्फ मंडळाचे तत्कालीन सीईओ फाईव्ह स्टार लाइफ...!


राज्य वक्फ मंडळाचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सय्यद जुनैद कार्यकाळातील कथित फाईलीची,आदेशांची अनियमिततांच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली जात आहे. वक्फ मंडळाच्या कारभार संशयास्पद स्थितीत असल्याने याची शासनाने दखल घेउन वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे ही शासन आणि प्रशासनाची जबाबदारी आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कारभार व आदेशांवर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. गेल्या पाच वर्षांत वक्फ मंडळात अधिकारांचा गैरवापर झाला त्याची जबाबदारी निश्चित करून या बाबींची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यकाळात ते जास्त वेळ त्यांनी मुंबई कार्यालयात बसून काढले होते पण ते जेव्हा छत्रपती संभाजीनगर वक्फ कार्यालयात यायचे कुठे थांबायचे ? तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांची फाईव्ह स्टार थाटातच असायची असल्याची माहिती समोर आली आहे.

SELF
शेअर करा: share Facebook share Twitter share WhatsApp
person

लेखकाबद्दल

Yunus Khan

Yunus Khan हे दैनिक लोकनिष्ठचे वार्ताहर आहेत. ते महाराष्ट्राच्या विविध विषयांवर सखोल लेखन करतात.

संबंधित बातम्या

comment प्रतिक्रिया (0)

प्रतिक्रिया द्या