trending_up TRENDING:

प्रशासकीय पारदर्शकता की निव्वळ टोलवाटोलवी ?

शासन निर्णय धाब्यावर राज्य वक्फ मंडळाचा अजब कारभार !

person
प्रशासकीय पारदर्शकता की निव्वळ टोलवाटोलवी ?

महाराष्ट्र राज्य सरकारने नुकत्याच जारी केलेल्या प्रशासकीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार, लोकप्रतिनिधी किंवा अधिकृत बैठकींच्या पत्रांकडे आणि इतिवृत्तांकडे दुर्लक्ष करणाऱ्या किंवा ते दडपणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश मुख्य सचिवांकडून देण्यात आले आहेत. बैठकीचे इतिवृत्त अधिकाऱ्यांनी दडपल्यास किंवा त्यात फेरफार केल्यास अशा निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असे नमूद केल्या आहे. शासकीय नियमांनुसार, बैठकीचे इतिवृत्त वेळेत आणि पारदर्शकपणे सादर करणे बंधनकारक असते पण महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त गेल्या तीन वर्षांपासून लपवून वक्फच्या अधिकृत संकेतस्थाळावर प्रसिद्ध करण्यात आलेले नाही आणि यावर वक्फ मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष, सदस्य किंवा वक्फ प्रशासन काहीही बोलण्यास किंवा माहिती उघड करण्यास टाळेटाळ करत आहे.


वक्फ मंडळाच्या बैठकींचे इतिवृत्त (मीटिंग चे मिनिट्स) आणि वार्षिक अहवाल संकेतस्थळावर प्रसिद्ध न करता २०२३ पासून लपविल्याची गंभीर बाब सप्टेंबर २०२६ मध्ये उघडकीस आली आहे. यावर कारवाही करण्याऐवजी वक्फ प्रशासन गप्प बसले आहे. वक्फच्या संबंधित अधिकाऱ्यांनी बैठकीचे इतिवृत्त लपवणे किंवा वेळेत न देणे हा कायदेशीर गुन्हा आणि सेवा नियमांचा भंग आहे. अशा प्रकरणांमध्ये दोषी अधिकाऱ्यांवर विविध कायद्यांनुसार कडक कारवाईची तरतूद हि आहे, असे असतांनाही देखील राज्य वक्फ मंडळ प्रशासन अधिकाऱ्यांची पाठ राखण करीत असल्याचे दिसून येत आहे. हे मनमानी कारभार उघड झाल्यानंतर वक्फ मंत्री, वक्फ प्रशासन, वक्फ सचिवालय संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगविषयक विभागीय कारवाईचे आदेश देऊ शकतात अशी तरतूद हि आहे तरी हि याकडे यासर्वांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याची माहिती समोर आली आहे. वक्फ कारभारात पारदर्शतेचा ढोंग जास्त काळ टिकणार नाहीत...!


मंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त वेळेत प्रसिद्ध करण्याची जवाबदारी कोणाची हे वक्फ प्रशासनाने ठरवून कायदेशीर कार्रवाही करावी व याबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडून खुलासा करावा अशी मागणी होत आहे. कायद्याने निर्णय व पारित ठरावाची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आवशयक आहे जेणे करून काही आक्षेप असल्यास त्याला कायदेशीर लढा देऊन अन्याय झालेल्या लोकांना प्रस्तावित व पारित निर्णयाला न्यायालयात आव्हान देता येते परंतु आता अपील करण्याचा कालावधी उलटून गेला आहे. २०२३ पासून मंडळाने बैठकीचे इतिवृत्त आणि आदेश जाहीर केलेले नाहीत; यावरून असे दिसून येते की, मंडळाच्या बैठकीतील इतिवृत्त, आदेशांना न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते याची जाणीव असल्यानेच ते जाणीवपूर्वक संकेतस्थळावर अपलोड केले गेले नाहीत असे कायदेतज्ज्ञाचे मत आहे. शासन निर्णयानुसार माहिती सादर करण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही, ही माहिती अधिकृत संकेतस्थाळावर प्रसिद्ध का नाही? जर राज्य वक्फ मंडळ कार्यालयाचीच ही अवस्था असेल, तर खालच्या स्तरावरील या विभागाकडून नेमकी काय अपेक्षा ठेवावी? माहिती लपवणे किंवा नोंदी न ठेवणे हाही अन्यायाचाच एक प्रकार आहे. शासन आणि वक्फ मंडळाच्या नियमांनुसार, दोषी अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबनाची कारवाही होणे अपेक्षित होती पण प्रशासनाने तसे काही करण्याची इच्छा दर्शविले नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घोटाळा प्रकरणी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. यापूर्वी दैनिक लोकनिष्ठ च्या बातमीची दाखल घेऊन कार्यवाही झालेली आहे. आता या प्रकरणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा वक्फमंत्री सुनेत्रा पवार काय भूमिका मांडतील याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

SELF
शेअर करा: share Facebook share Twitter share WhatsApp
person

लेखकाबद्दल

Kashaf Khan

Kashaf Khan हे दैनिक लोकनिष्ठचे वार्ताहर आहेत. ते महाराष्ट्राच्या विविध विषयांवर सखोल लेखन करतात.

संबंधित बातम्या

comment प्रतिक्रिया (0)

प्रतिक्रिया द्या