छत्रपती संभाजीनगर (दै. लोकनिष्ठ)
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात होत असलेल्या भ्रष्ट्राचार व मनमानी कारभारा मुळे नव्या वादाला तोंड फुटले असून वक्फ मंडळाचे चेअरमन व सदस्य यांनी वक्फ मंडळामध्ये अधिकारी- कर्मचारी यांच्या नियुक्ती व पदौन्नती मध्ये झालेल्या अनियमितता असतांना नुकतेच मंडळाने मनमानी पद्धतीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याला वक्फ प्रशासनावर लादल्याची माहिती समोर आली आहे.
सेवानिवृत्त अधिकारीवर कोणाचा एवढा प्रेम व आशीर्वाद आहे आणि कोणाच्या शिफारस व दबावावर नियुक्ती देण्यात आली आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाहीत. निवृत्त झालेल्यांपैकी एकाखास अधिकारीची विशेष करून नियुक्तीची गरज होती का ? सध्या कार्यरत अधिकारी कर्मचारी सक्षम नाहीत का ? ज्याच्या विरुद्ध अनेक गंभीर तक्रारी असतांना त्याला कोणाच्या दबावाने किंवा कोणत्या यंत्र वापरून नियुक्ती दिल्या ? एवढा गंभीर कायदेशीर पेच निर्माण झालेला असताना वक्फ प्रशासनाने याबाबत शासनाकडून किंवा सक्षम प्राधिकरणाकडून कायदेशीर मार्गदर्शन का घेतले नाही ?
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात सध्या कायद्याचे राज्य आहे की पदाधिकाऱ्यांची मनमानी असा संतात सवाल आता उपस्थित केला जात आहे. वक्फ मंडळात ज्यांचे काहीही अधिकार व पद कायम राहिले नाहीत ते वक्फच्या कारभारात हस्तक्षेप करत असल्याने व मीटिंग कॉन्फरेन्स आणि मुंबई कार्यालयात ठाण मांडून बसलेले असल्याचे चित्र दिसून येत असल्यावरून काही सदस्यांमध्ये नाराजगी असल्याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. वक्फ मंडळाच्या मनमानी कारभार व भ्रष्ट कार्यपद्धतीवर थेट बोट ठेवण्यात येत आहे. वक्फ मंडळातील निर्णय केवळ बैठकांचा कायदेशीरपणाच नव्हे, तर मंडळाच्या आर्थिक कारभारावरही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. याविषय सरकार समोर अनेक तक्रार असल्यावरही कार्यवाही होत नसल्याने त्रस्त नागरिकांनी सरकारच्या भूमि केवर संशय येत असल्याचे म्हटले आहे. आता या निवृत्त अधिकाऱ्याला शासनाचे आशीवाद कि प्रशासनाचा वरदान प्राप्त होते यावर राज्य सरकार काय भूमिका बजावेल याची सर्वांना प्रतीक्षा आहे. सेवा निवृत्त अधिकारी माजीद पटेल यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केलेल्या या मनमानी कारभाराविरोधात नाराजगी पसरलेली आहे. जाणीवपूर्वक ठेवून, आपल्या पदाच्या अधिकाराचा गैरवापर करून हि नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. कोणतीही चौकशी न करता पुनर्नियुक्ती केली गेली आहे. माजीद पटेल यांची नियुक्ती बेकायदेशीर व शासन आणि प्रशासनाच्या आदेश निर्देशांच्या विरुद्धची असल्याची सूत्रांनी म्हटले आहे. माजीद पटेल यांची कंत्राटी नियुक्ती चुकीच्या माहिती आधारे प्रशासनाला गोत्यात आणणार, सरकारी आणि निमसरकारी विभागांम ध्ये शिस्तभंग किंवा गैरव्यवहार/घोटाळ्यांत दोषी सिद्ध झालेल्या कर्मचाऱ्यांना नियम डावलून भ्रष्ट मार्गाने पुन्हा नियुक्ती किंवा पदोन्नती देण्याचे प्रकार वेळोवेळी समोर आले आहेत. याप्रकरणात असे काही घडल्या असल्याचा संशय लोकांमध्ये निर्माण होत आहे. ठराविक अधिकारी माजीद पटेलची नियुक्ती शासनाच्या विरुद्ध मनमानीपद्धतीने करण्यात आल्याची चर्चा कार्यालयात सध्या जोराने सुरु आहे. हि नियुक्ती तातडीने रद्द करणे एकमात्र विकल्प वक्फ प्रशासना समोर राहिले आहे.
वक्फ प्रशासनात व त्याचबरोबर राज्यभरातून वक्फ कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्यांमध्ये माजीद पटेल ची नियुक्तीची माहिती ऐकून नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून वक्फ मंडळ आणि प्रशासनाने वास्तुरीस्थिती स्पष्ट करावी व ज्याला बोलण्याची पद्धत माहित नाही, अपमानास्पद वागणूक, लोकांना कार्यालयात शिव्या देणाऱ्या व मनमानीपद्धतीने वागणाऱ्याला तात्काळ कार्यमुक्त करून नियुक्ती रद्द करण्याची मागणी केले जात आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून ही बेकायदेशीर नियुक्ती रद्द केले नाही तर याविरोधात न्यायालयीन लढा उभारला जाईल असे स्पष्ट दिसून येते. आता शासन आणि वक्फ प्रशासन काय भूमिका मांडतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





प्रतिक्रिया द्या