छत्रपती संभाजीनगर राज्यातील पाच पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे जागा वाटप जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जाते. त्यानुसार तीन जागा भाजपा तर प्रत्येकी एक जागा महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादीला देण्याचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. नागपूर, पुणे, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर पैकी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या जागेवरून भाजपाचे स्थानिक पदाधिकारी, नेते आक्रमक झाले आहेत.
ही जागा कोण लढवणार? हे महायुतीने अद्याप अधिकृतपणे जाहीर केले नसले तरी यावरून दोन्ही पक्षात तानातानी असल्याचे चित्र आहे. त्यातुनच भाजपाच्या इच्छुकांनी सहा अर्ज खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या ६६ इच्छुकांनी तब्बल ११६ नामनिर्देशन अर्ज खरेदी केले आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया २९ सप्टेंबरपासून सुरू झाली असून तिसऱ्या दिवशीपर्यंत नेलेल्या ११६ अर्जापैकी १ ऑक्टोबर रोजी केवळ दोनच अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्तालयातर्फे देण्यात आली. नामनिर्देशन अर्ज खरेदी केलेल्यांमध्ये सर्वाधिक म्हणजेच ४३ अर्ज हे अपक्ष आहेत. गुरुवारी २० जणांनी ४० अर्ज खरेदी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांच्यासाठी अर्ज खरेदी करण्यात आले आहेत. राष्ट्रीय समाज पक्षासाठी २ इच्छुकांनी अर्ज घेतले. यासोबतच ऑल इंडिया इंन्कलाब पार्टी, राष्ट्रीय किसान परिषद, जय सेवालाल बहुजन पार्टी, भाकप, रिपाई आदि पक्षांच्या प्रत्येकी १ इच्छुकांनी अर्ज खरेदी केले. मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी तिसऱ्या दिवशी विक्री झालेल्या ११५ अजर्जापैकी दोन अर्ज दाखल झाले होते. यामध्ये बाबासाहेब भुजंगराव उगले यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता, तर एक अर्ज हा एका पक्षाकडून दाखल करण्यात आला होता. महत्त्वाचे म्हणजे या पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंदणीच नसल्याचे समोर आले आहे. भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस भिडणार? मराठवाडा पदवीधर मतदार संघ हा भाजपचा पारंपारिक गड राहिला आहे. त्यामुळे सहाजिकच आम्ही या जागेवर दावा सांगणार आहोत. प्रदेशाध्यक्ष वींद्र चव्हाण तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही महायुतीत मराठवाडा पदवीधरची जागा भाजपासाठी सोडवून घ्या, अशी आग्रही मागणी केली असल्याचे विधान परिषदेचे माजी आमदार संजय केणेकर यांनी स्पष्ट केले. ही जागा सुरुवातीपासून भाजपकडे असल्यामुळे प्रत्येक कार्यकत्यांची कार्यकत्यांची इच्छा इच्छा देखील के जागा आपल्यालाच मि ळावी अशी आहे. राहिला प्रश्न महायुतीमध्ये जागा कोणाला सोडायची? याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीचा धर्म सांगत जागेवर दावा केला असला तरी जेव्हा जेव्हा राज्यात महायुती म्हणून काही निर्णय घेतला गेला तेव्हा आमच्या मित्रपक्षाने हायुतीचा धर्म किती पाळला? याचे आत्मपरीक्षण करावे, असा टोलाही संजय केनेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांना नाव न घेता लगावला. दोन लाख ९० हजार पदवीधर मतदारांची संख्या आहे. भाजपने या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी गेल्या वर्षभरापासून सुरू केली आहे. आम्ही दोन लाख मतदारांची नोंदणी केल्याचा दावाही संजय केणेकर यांनी केला.
मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणी प्रमुख म्हणून संजय केणेकर यांच्यावर पक्षाने वर्षभरापूर्वी जबाबदारी सोपवली होती. २००८ पूर्वी मराठवाडा पदवीधर मतदारसंघावर भाजपची मजबूत पकड़ होती. मात्र गेल्या तीन टर्म पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सतीश चव्हाण हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सतीश चव्हाण यांनी पक्षाने आपल्याला निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिल्याचे सांगत मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे संजय केणेकर यांच्यासह भाजपच्या काही इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे.
संजय केणेकर यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेत भेट घेतली होती. या भेटीदस्यानच केनेकर यांनी पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारीसाठी देवाभाऊंना साकडे घातल्याची चर्चा आहे. विधान परिषदेवर केवळ ११ महिन्यांचा कालावधी आमदार म्हणून मिळाल्यानंतर संजय केनेकर हे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निमित्ताने केनेकर यांना ही संधी मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशावेळी महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्येच उमेदवारीवरून रस्सीखेच होणार हे अटळ आहे. अशा परिस्थितीत मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव देखील पुढे येऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.





प्रतिक्रिया द्या