trending_up TRENDING:

राज्यात आणखी एका परीक्षेत गोंधळ?

पुणे पालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत घोटाळा; विद्यार्थ्यांमध्ये संताप!

person
राज्यात आणखी एका परीक्षेत गोंधळ?

पुणे - राज्यात एकामागोमाग परीक्षेत घोळ होत असल्याचे उघडकीस येत आहे. आता पुणे पालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. प्रशासनातील मोठ्या व्यक्तीचा या घोटाळ्यात समावेश असल्याचा आरोप शिवसेना पक्षाचे नगरसेवक नाना भानगिरे यांनी केला आहे.

राज्यातील एमपीएससी परीक्षा, हायकोर्टाची लिपिक परीक्षा घोटाळ्या पाठोपाठ आता पुणे पालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप पुणे महानगर पालिकेतील घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. या परीक्षेत गडबड झाल्याचे १६ जून रोजी निदर्शनास आले होते असे शिवसेना पक्षाचे नगर सेवक नाना भानगिरे यांनी म्हटले आहे.

पुणे महानगर पालिकेने कबुल केले होते की तीन जणांनी चिटींग केले आहे. हे चिटींग झाल्याचे समोर येऊन देखील पुणे महानगर पालिकेचे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांनी १६९ जणांची नियुक्ती कशी काय केली असा सवाल नगर सेवक नाना भानगिरे यांनी केला आहे. परीक्षेतील पेपर आधीच नियुक्ती नियमबाह्य असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ही नियुक्ती रद्द करावी आणि पुन्हा एकदा परीक्षा घ्यावी आणि उमेदवारांवरील अन्याय दूर करावा अशीही मागणी नाना भानगिरे यांनी केला आहे.


मुंबई हाय कोर्टाच्या लिपीक परीक्षेत गडबड

देशभरात नीटसह अनेक परीक्षेत घोटाळे होत असतानाच राज्यातही अनेक परीक्षांमध्ये घोटाळे होत असल्याचे उघडकीस येत आहे. आधी एमपीएससी परीक्षेत घोळ झाल्याचा आरोप होत होता. त्यात मुंबई हाय कोर्टाच्या लिपीक परीक्षेत गडबड झाल्याने राज्यभरातील परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी मोठी निदर्शने केली होती. संभाजीनगर परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. या निदर्शात सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी सहभाग घेतला होता. या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय कालच हायकोर्ट प्रशासनाने घेतला आहे. आणि नवीन परीक्षांची तारीख लवकरच जाहीर केले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

SELF
शेअर करा: share Facebook share Twitter share WhatsApp
person

लेखकाबद्दल

Yunus Khan

Yunus Khan हे दैनिक लोकनिष्ठचे वार्ताहर आहेत. ते महाराष्ट्राच्या विविध विषयांवर सखोल लेखन करतात.

संबंधित बातम्या

Chakan MIDC: चाकणमध्ये उद्योगांच्या बाबतीत जे घडतय तसं होऊ नये म्हणून राज्य सरकारने घेतला महत्वाचा निर्णय
Pune

Chakan MIDC: चाकणमध्ये उद्योगांच्या बाबतीत जे घडतय तसं होऊ नये म्हणून राज्य सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

Chakan MIDC Problem: चाकण औद्योगिक वसाहतीमधील रस्ते हे वाहतूक करण्या इतपतही योग्य नसल्याने उद्योजक प्रचंड नाराज होते. रस्त्यांची अवस्था चांगली नसल्यामुळे वाहतुकीला रोज मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहे.

पुणे मेट्रोचा विस्तार: हिंजवडी ते शिवाजीनगर मार्ग २०२७ पर्यंत पूर्ण होणार
Pune

पुणे मेट्रोचा विस्तार: हिंजवडी ते शिवाजीनगर मार्ग २०२७ पर्यंत पूर्ण होणार

पुणे मेट्रोच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गाचे काम वेगाने सुरू असून २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता.

comment प्रतिक्रिया (0)

प्रतिक्रिया द्या