trending_up TRENDING:

पुणे महापालिका आयुक्तांचा 'यू टर्न'; ५०० वॉर्डनच्या निविदेला स्थगिती !

person
पुणे महापालिका आयुक्तांचा 'यू टर्न'; ५०० वॉर्डनच्या निविदेला स्थगिती !

पुणे शहरातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी तातडीची बाब प्रशासनाच्या विविध विभागांनी ५०० वॉर्डन घेण्यासाठी तातडीने मान्यता दिली होती. हा प्रस्ताव स्थायी समितीने मान्य करून ठेकेदाराला काम करण्याचे आदेश दिले. २२५ वॉर्डनची नियुक्तीही पूर्ण झाली आहे. मात्र, या ठेकेदाराबाबत तक्रार आल्याने आयुक्त नवल किशोर राम यांनी यू-टर्न घेत या ठेकेदाराच्या कामाला स्थगिती देऊन या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.


वाहतूक पोलिसांनी पुणे महापालिकेकडे वॉर्डनची मागणी केली होती. त्यामुळे महापालिकेच्या सुरक्षा विभागाकडून निविदा प्रक्रिया सुरू केली होती. पण काही दिवसांपूर्वी कात्रज कोंढवा रस्त्यावर दुचाकीचा अपघात होऊन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. त्यावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रशासनावर टीकेची झोड उठवली. त्यावेळी निविदेत वेळ वाया न जाऊ देता '६७ ३ क' या नियमानुसार विनानिविदा तातडीची बाब म्हणून मे. जयशंकर असोसिएट या ठेकेदाराला ५०० वॉर्डन पुरविण्याचे सुमारे १८ कोटी रुपयांचे काम देण्यात आले होते. दरम्यान, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात चुकीचे काम केल्याबद्दल मे. जयशंकर असोसिएट या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात आले होते. त्याचा शिक्षेचा कालावधी संपल्यानंतर वॉर्डन पुरविण्याचे काम देण्यात आले होते. काळ्या यादीतील ठेकेदाराला काम देण्यात आले असे आरोप, तसेच '६७ ३ क' या कलमाचा गैरवापर करून वर्षभरासाठी निविदा दिली.


या ठेकेदाराकडे आवश्यक परवाने नाहीत असाही आरोप सोशल मीडियातून करण्यात आला आहे. त्यामुळे आयुक्त राम यांनी या निविदेला स्थगिती दिली आहे.


या प्रकरणाची सखोल चौकशी करून पुढील लेखी अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत जयशंकर असोसिएट ठेकेदाराकडून काम करून घेऊ नये अन्यथा कारवाई केली जाईल असे आदेशात नम द केले आहे. ठेकेदाराला वर्कऑर्डर दिल्यानंतर वॉर्डनची भरती सुरू झाली आहे. आतापर्यंत २२५ जणांची नियुक्ती झाली आहे. गणेशोत्सवाच्या काळात १२० जणांनी विविध ठिकाणी पोलिसांना मदत केली आहे. मात्र, आता चौकशीच्या फेऱ्यात ही निविदा अडकल्याने ज्यांची नियुक्ती झाली त्या वॉर्डनचे काय होणार? त्यांना पगार मिळणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


महापालिका आयुक्तांना उघड धमकी !


पुणे महापालिकेच्या ९० कोटी रुपयांच्या रस्ता विकास प्रकल्पाचे टेंडर आपल्या मर्जीतील ठेकेदाराला न मिळाल्याने सत्ताधारी भाजपच्या एका आमदाराने थेट महापालिका आयुक्तांना अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा प्रकार सम ोर आला आहे. आरटीओ चौक ते बंडगार्डन पूल दरम्यानच्या या रस्त्याच्या निविदा प्रक्रियेत राजकीय दबावाला बळी न पडता महापालिका आयुक्तांनी नियमानुसार आणि पारदर्शकपणे प्रक्रिया पूर्ण केली. सर्वात कमी (१२ टक्के कमी) दराची निविदा भरणाऱ्या ठेकेदाराला काम दिल्याने महापालिकेची तब्बल नऊ कोटी रुपयांची बचत झाली असली, तरी यामुळे संतप्त झालेल्या आमदाराने आयुक्तांना धमकी देण्यासह इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना विधानसभेत हक्कभंग आणण्याची दमबाजी केल्याची माहिती समोर आले आहे.

SELF
शेअर करा: share Facebook share Twitter share WhatsApp
person

लेखकाबद्दल

Kashaf Khan

Kashaf Khan हे दैनिक लोकनिष्ठचे वार्ताहर आहेत. ते महाराष्ट्राच्या विविध विषयांवर सखोल लेखन करतात.

संबंधित बातम्या

comment प्रतिक्रिया (0)

प्रतिक्रिया द्या