trending_up TRENDING:

पुण्यात 'छात्रों की गुंज' हजारो मुलींसमोर राहुल गांधींचे मनुस्मृतीवर मोठे भाष्य, भारतीय महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद

person
पुण्यात 'छात्रों की गुंज' हजारो मुलींसमोर राहुल गांधींचे मनुस्मृतीवर मोठे भाष्य, भारतीय महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद

छात्रो की गूंज' या कार्यक्रमाचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हजेरी लावली. या संवादादरम्यान त्यांनी महिला व मुलींची सुरक्षा, शिक्षण क्षेत्रातील समस्या, वाढती बेरो बेरोजगारी आणि परीक्षांमधील पेपरफुटी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. जवळपास या कार्यक्रमासाठी २५ ते ४० हजार विद्याथ्यांनी सहभाग नोंदवला. यात महाविद्यालयीन तरूणांची आणि विशेषतः झेन झी तरूण मोठ्या प्रमाणात होते. या कार्यक्रमापूर्वी बराच राडा झाल्याचे पाहायला मिळाले.


राहुल गांधी यांचा हा देशातील चौथा 'छात्रों की गुंज' कार्यक्रम होता, जो हजारो मुलींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. भाजपने हा कार्यक्रम यशस्वी होऊ नये यासाठी अनेक अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. मुलींना कार्यक्रमात सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी धमक्या देण्यात आल्या आणि हिंसक घटना घडवून आणल्याचा आरोपही करण्यात आला. मात्र, या सर्व प्रयत्नांनंतरही कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.


बी लाऊड, बी प्राऊड अँड फाईट फॉर युअर स्पेस काँग्रेस नेते राहुल गांधी पुण्यात असून 'छात्रों की गुंज' कार्यक्रमात सहभागी झाले. है. सभास्थळी मोठ्या उत्साहाने आलेल्या तरूणाईशी, जेन-झी शी त्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. पुण्यातील कार्यक्रमात संबोधित करताना राहुल गांधी यांनी मनुस्मृतीवर मोठे भाष्य केले " मनुस्मृतीने महिलांना ३ चौकटीत बसवले. महिलांना स्वातंत्र्य नाही असा मनुस्मृतीचा विचार" असे राहुल गांधी म्हणाले. विद्येचे माहेर समजल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'छात्रों की गुंज' या कार्यक्रमासाठी काँग्रेसकडून गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार तयारी सुरू होती. काँग्रेसचे अनेक दिगज नेते याच कार्यक्रमासाठी पुण्यात होते. दरम्यान कार्यक्रमापूर्वी पुण्यात एबीव्हीपी आणि एनएसयूआयचे कार्यकत्यांमध्ये वाद झाला होता, त्याच पार्श्वभूमीवर कार्यक्रमस्थली चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

मनुस्मृतीचा हिंस्र पिंजरा तोडा! संस्कृतीचे जोखड झुगारून मनुस्मृतीच्या बंधनातून महिलांनी बाहेर पडायला हवे, त्या देशाची सर्वांत मोठी ताकद आहेत. त्यांच्या यांच्या आयुष्यावर त्यांचा स्वतःचाच पूर्ण अधिकार हवा. यासाठी आवाज उठया, आत्मसन्मान ओळखा आणि तुमच्या हक्कांसाठी भांडा, असे सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुण्यात मनुस्मृती आणि पुरुषसत्ताक पद्धतीवर जोरदार प्रहार केला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी दिलखुलास संवाद साधला. पुण्यातील या कार्यक्रमाला मुलींची, महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तरुणींच्या भविष्याबद्दल बोलताना राहुल गांधी यांनी काँग्रेसचे व्हिजनही सांगितले. महिला या देशाची सर्वात मोठी ताकद आहे, असे म्हणत राहुल गांधी यांनी आजच्या कार्यक्रमात महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या स्वातंत्र्याच्या मुद्दधावर भर दिला. शेकडो महिलांच्या उपस्थितीत त्यांनी पिंजरा तोडा असे आवाहन करत, महिलांनी त्यांच्यातील अद्वितीय क्षमता ओळखून सामाजिक बंधनातून मुक्त व्हावे, असे प्रतिपादन केले.


मी आज राजकारणावर बोलणार नाही. भारताची ताकद काय असे मला अनेकदा विचारले जाते. त्याबद्दल वेगवेगळी उत्तर मिळतात, पण माझे त्यावर स्पष्ट मत आहे. ७० कोटी भारतीय महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे. देशातील महिला या देशाची सर्वात मोठी ताकद आहे, असे ते म्हणाले.


महिलांना केवळ मुलगी, पत्नी किंवा आई या तीन चौकटीत पाहणे चुकीचे आहे. या भूमिका महत्त्वाच्या असल्या तरी, ती त्यांची एकमेव ओळख असू नये, असे राहुल गांधींनी स्पष्ट केले. पुढे त्यांनी मनुस्मृतीचा दाखला देत म्हटले की, मनुस्मृतीत असे म्हटलेय ती महिला बालपणी वडिलांच्या वडिलांसठी, है, तारुण्यात तारुण्यात पतीसाठी आणि म्हातारपणी निधनानंतर मुलांसाठी जगचे. तसेच महिलांनी कधीही स्वतंत्र असू नये असेही नमूद केले आहे. मात्र हे विचार लजास्पद असल्याचे म्हणत राहुल यांनी त्यांचा तीव्र निषेध केला. आपल्या स्त्रिया स्वतंत्र असायला हव्यात. तुम्ही कोणावरही अवलंबून नाही. तुमचे तुमच्या वडिलांशी, नवयाशी आणि मुलाशी नातेसंबंध असतात, पण तुमची ओळख त्यांच्यामुळे ठरत नाही. तुमची स्वतःची ओळख असते. महिला या पुरुषांच्या तुलनेत स्वभावतः अधिक संवेदनशील, सौम्य आणि दयाळू असतात. त्यामुळेच माझा ठाम विश्वास आहे की, भारतातील महिला ही देशाची सर्वात मोठी संपत्ती आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.


महिलांकडे पाहण्याच्या समाजाच्या पारंपरिक दृष्टिकोनावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, अनेकदा महिलांची ओळख त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वयापेक्षा त्यांच्या कौटुंबिक भूमिकांशी जोडली जाते. पुरुषांशी संवाद साधताना महिलांकडे प्रामुख्याने तीनच चौकटींमध्ये पाहिले जाते मुलगी, पत्नी किंवा आई. या भूमिका नक्कीच महत्त्वाच्या आहेत आणि त्यांच्यात कोणतीही कमीपणा किंवा गैर नाही. मात्र, एखाद्या महिलेची ओळख केवळ या नात्यांपुरती मर्यादित राहू नये असे ते म्हणाले. भाजपने राहुल गांधींच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते तुहिन सिन्हा यांनी राहुल यांच्यावर 'हिंदूफोबिया' अर्थात हिंदू धर्माबद्दलची द्वेषपूर्ण भीती कायम ठेवल्याचा आरोप केला आहे.

SELF
शेअर करा: share Facebook share Twitter share WhatsApp
person

लेखकाबद्दल

Yunus Khan

Yunus Khan हे दैनिक लोकनिष्ठचे वार्ताहर आहेत. ते महाराष्ट्राच्या विविध विषयांवर सखोल लेखन करतात.

संबंधित बातम्या

Chakan MIDC: चाकणमध्ये उद्योगांच्या बाबतीत जे घडतय तसं होऊ नये म्हणून राज्य सरकारने घेतला महत्वाचा निर्णय
Pune

Chakan MIDC: चाकणमध्ये उद्योगांच्या बाबतीत जे घडतय तसं होऊ नये म्हणून राज्य सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

Chakan MIDC Problem: चाकण औद्योगिक वसाहतीमधील रस्ते हे वाहतूक करण्या इतपतही योग्य नसल्याने उद्योजक प्रचंड नाराज होते. रस्त्यांची अवस्था चांगली नसल्यामुळे वाहतुकीला रोज मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहे.

पुणे मेट्रोचा विस्तार: हिंजवडी ते शिवाजीनगर मार्ग २०२७ पर्यंत पूर्ण होणार
Pune

पुणे मेट्रोचा विस्तार: हिंजवडी ते शिवाजीनगर मार्ग २०२७ पर्यंत पूर्ण होणार

पुणे मेट्रोच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गाचे काम वेगाने सुरू असून २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता.

comment प्रतिक्रिया (0)

प्रतिक्रिया द्या