trending_up TRENDING:

Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?

Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: छत्रपती संभाजीनगर येथील खवड्या डोंगरावरुन खाली पडून तीन जणांचा मृत्यू झाला. सदर घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला.

person
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?

Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: छत्रपती संभाजीनगर येथील तिसगाव परिसरात असणाऱ्या खवड्या डोंगरावरुन खाली पडून तीन जणांचा मृत्यू झाला. डोंगरावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुलाला वाचवताना त्याच्या आई-वडिलांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल (21 ऑगस्ट) घडली. कुणाल मुरलीधर चांदवडे (Kunal Chandavade), मुरलीधर चांदवडे आणि संगीता चांदवडे अशी मृतांची नावे आहेत. (Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Marathi News)

गेल्या काही दिवसांपासून कुणालचा वडिलांसोबत वाद झाला होता, अशी माहिती समोर आली. त्यानंतर कुणाल काल सकाळी सुमारे 10 वाजता खवड्या डोंगरावर गेला. त्याचा हेतू टोकाचं पाऊल उचलण्याचा असल्याचं समोर आल्यानंतर आई-वडील त्याला समजावण्यासाठी डोंगरावर पोहोचले. कुणालला समजावण्याचे प्रयत्न सुमारे तीन तास सुरू होते. पोलीस, स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनीही त्याला खाली आणण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचवण्यासाठी खाली जाळी लावण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र कुणाल वारंवार आपली जागा बदलत होता. अखेर कुणालने डोंगरावरून उडी घेतली. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडील मुरलीधर यांचाही तोल गेला आणि ते खाली कोसळले. त्यानंतर मुलगा आणि पती खाली पडल्याचे पाहून आई संगीता यांचाही दुर्दैवी अंत झाला. तिघांचाही डोंगराच्या खाली पडून मृत्यू झाला. दरम्यान, Apple कंपनीच्या आयफोन 15 मोबाईलसाठी कुणाल आत्महत्या करण्यासाठी डोंगरावर गेला, अशी प्राथमिक माहिती समोर आली होती. परंतु प्रत्यक्षदर्शी आणि गावचे माजी सरपंच संजय जाधव यांनी एबीपी माझाशी बोलताना महत्वाची माहिती दिली.


कुणालकडे आयफोनच होता; प्रत्यक्षदर्शी संजय जाधव काय काय म्हणाले?

कुणालने आयफोनमुळे आत्महत्या केली अशी चर्चा होती. यात एक प्रत्यक्षदर्शीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आयफोनबाबत बोलताना दिसतोय. आम्ही व्हायरल व्हिडीओमध्ये ज्यांचा आवाज आहे. त्यांना एबीपी माझाने शोधून काढले. त्यांचं संजय जाधव असं नाव आहे. मुलाला आयफोन हवा होता, अशी कुठलीही चर्चा तिथं नव्हती. प्रत्यक्षात त्या मुलाजवळ आयफोनच होता, असं प्रत्यक्षदर्शी आणि माजी सरपंच संजय जाधव म्हणाले. तुझ्याकडे आयफोन आहे, आई-वडील किती लाड करतात, असं म्हणत मी कुणालची समजूत काढत होतो, असं संजय जाधव यांनी सांगितले.


डीसीपी रत्नाकर नवले काय म्हणाले?

आयफोन हवा होता म्हणून कुणालने आयुष्य संपवलं, अशी आत्महत्येनंतर सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली. पण तपास पुढे सरकला आणि या चर्चेलाच आता पोलिसांनी ब्रेक लावला. आयफोन हे आत्महत्येचं कारण असल्याचं प्राथमिक तपासात दिसत नाही, असं डीसीपी रत्नाकर नवले यांनी स्पष्ट केलंय. 


आई आणि लेकाचा काळीज चिरणारा शेवटचा संवाद-

पोलीस, स्थानिक आणि आई कुणालला आत्महत्या न करण्यासाठी विनवणी करत होते. कुणालने खाली उतरावे म्हणून आईने जिवाच्या आकांताने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तुझा पप्पांसोबत वाद आहेत ना, हे बघ मी आताच मंगळसूत्र काढून फेकते, तुझ्या वडिलांना सोडून देते, तुझ्यासोबत येते, आपण दोघं राहू, पण मला सोडून जाऊ नकोस, अशी आर्त विनवणी आई करत होती. दोघे हताश होऊन संवाद साधत होते. आईच्या आर्त हाकेनंतरही कुणाल, आई, माझे कोणीच ऐकत नाही, मला जगण्यात रस नाही, माझ्या लाइफचे सोल्युशनच नाही, काहीच होणार नाही गं, असं कुणाल म्हणाला आणि पुढे सगळं होत्याचं नव्हतं झालं.

SELF
शेअर करा: share Facebook share Twitter share WhatsApp
person

लेखकाबद्दल

Kashaf Khan

Kashaf Khan हे दैनिक लोकनिष्ठचे वार्ताहर आहेत. ते महाराष्ट्राच्या विविध विषयांवर सखोल लेखन करतात.

संबंधित बातम्या

comment प्रतिक्रिया (0)

प्रतिक्रिया द्या