(दैनिक लोकनिष्ठ - युनूस खान ) महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ विभागाशी संबंधित घोटाळ्यांचे अनेक आरोप समोर आले आहेत, ज्यामध्ये संस्थाधारकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित मंत्र्यांवर आणि प्रशासनावर हे प्रकरण दडपल्याचे किंवा दुर्लक्ष केल्याचे आरोप केले आहेत.दैनिक लोकनिष्ठ ने वक्फ मंडळातील बैठकीचे इतिवृत्त संकेतस्थळावर गेल्या २०२३ पासून आजपर्यंत मंडळाने सार्वजनिक (प्रसिद्ध ) न केल्याचे उघड केल्याने राज्यभर याची चर्चा केली जात आहे पण राज्य सरकार व त्यांच्या मंत्र्यांनी या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष करून या अनागोंदी कारभाराला संरक्षण दिल्याचे दिसून येत आहे.
वक्फ मंडळाच्या दोषियांना वाचवण्यात अधिकाऱ्यांचा सहभाग अगदी स्पष्ट आहे. बैठकीच्या इतिवृत्त प्रकरणात शासन आणि प्रशासन ज्या प्रकारे वागत आहे, त्यावरून हे सिद्ध होते की ते अधिकाऱ्यांचा गैरवापर करून दोषियांना बैठकीच्या इतिवृत्त ( बोर्ड मीटिंग मिनिट्स ) दडपणाऱ्यांना संरक्षण करण्याचा प्रयत्न करत आहेत.यामुळे कायदेशीर कारवाई होण्यास विलंब होतो अशी शंका निर्माण झाली आहे.
वर्ष २०२३ पासून २०२६ पर्यंत मंडळाच्या बैठकीत घाईगडबडीत घेण्यात आलेले निर्णय, ठराव आणि आदेश संशयास्पद असल्याची शक्यता नाकारता येत नाही. यात मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचे समजते. वक्फ मंडळाच्या बैठक विभाग अधीक्षकांची भूमिका संशयास्पद असल्याने आणि मंडळाच्या सदस्यांचे आशीर्वादाने वक्फ मंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त गेल्या तीन वर्ष पासून दडपून ठेवण्यात आले आहे. सभेचे इतिवृत्त (मीटिंग मिनिट्स ) तयार करणे व त्यावर अध्यक्ष व सदस्यांची आणि अधिकाऱ्याची मंजुरी स्वाक्षरी घेणे व इतिवृत्त कायम करणे याची जवाबदारी बैठक विभागाच्या अधिकाऱ्याचे असते प्रत्येक बैठकीचे आदेश,मंजूर ठराव कायम करणे व घोषित/प्रसिद्ध करणे करीत कायद्याने मुद्दत व काही नियम आहे आणि हे नियम केंद्र आणि राज्य सरकार सह शासकीय मंडळ आणि शासकीय कार्यालय व विभागांना बंधनकारक आहे . एक बैठकीच्या नंतर दुसऱ्या बैठकीत मंजूर ठराव व पारित केलेले आदेश बोर्डाने कायम केले नाहीत तर आदेश मंजूर ठराव बेकायदेशीर ठरविले जाऊ शकते. असे असतांनाही गेल्या तीन वर्षांपासून बैठकीचे इतिवृत्त प्रसिद्ध करण्यात आले नाही याला जवाबदार कोण ? तरी हि शासन आणि प्रशासनाने या दडपशाही व मनमानी कारभार चालविणाऱ्यांवर कारवाही केली नाही म्हणून आता लोकशाही मार्गाने या मनमानी कारभाराला ब्रेक लावण्याची वेळ आलेली आहे. उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक व औकाफ मंत्री व औकाफ सचिव यावर मौन का बसले आणि यावर कधी लक्ष केंद्रित करणार ?दोषियांविरुद्ध निलंबनाची कारवाही करून गुन्हा नोंदविण्यात यावा व शिस्त भंगाची कारवाही करावी अशी मागणी केली जात आहे. या प्रकरणाची एसआयटी (SIT) चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे आणि प्रशासनाकडून याकडे डोळेझाक (प्रकरण दडपण्याचा प्रयत्न) केली जात असल्याचे म्हटले जात आहे .
महत्वाचा प्रश्न असा आहे कि वक्फ मंडळाच्या बैठकीचे मिनिट्स दडपण्याचा प्रयत्न कोणाचा आहे ? आणि कोणाला वाचविण्यासाठी मिनिट्स दडपले जातेय याचा शासनाने विचार करावे.
वक्फ मंडळाच्या बैठकींचे (मिनिट्स ) इतिवृत्त हा या संपूर्ण वादावा सर्वात महत्वाया मुद्दा सध्या ठरत आहे. बैठकीत कोणते निर्णय झाले, कोणत्या प्रस्तावांवर चर्चा झाली, कोणते ठराव मंजूर झाले आणि त्यावर पुढील प्रशासकीय कार्यवाही काय झाली किती एनओसी, भाडेपट्टा करार , लीजडीड आणि किती प्रकरणे नॉन वक्फ केलाय याची अधिकृत माहिती जनतेसमोर येणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे इतिवृत्त सार्वजनिक करण्यास कोणाला आक्षेप आहे? ज्यांना आक्षेप होता त्यांचा कार्यकाळ संपूण गेला आहे मग कोणाच्या दबावमध्ये इतिवृत्त प्रसिद्ध करण्यात येत नाही ? इतिवृत्त प्रसिद्ध करून देण्यात अडथळा का निर्माण होत आहे? कोणाची कशी डील आहे ? आणि ही माहिती लपविण्याचे प्रयत्न होत असेल तर त्यामागे नेमके हेतू काय? असे थेट प्रश्न उपस्थित होत आहेत. कितीही राजकीय किंवा प्रशासकीय पातळीवर प्रयत्न झाले तरी नियमांनुसार शासन असो कि प्रशासन उपलब्ध असलेली माहिती उघड करणे गरजेचे आहेत. वक्फ कार्यालयाती बैठक विभाग प्रमुख/ अधीक्षक यांनी आपली जवाबदारी पार पडली नाही व पदाचा दुरुपयोग करून तीन वर्षांपासून माहिती व बैठकीचे इतिवृत्त लपविले प्रकरणी विभागीय चौकशी व शिस्त भंग कारवाहीची मागणी केली जात आहे.
उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्यक व औकाफ मंत्री सुनेत्रा ताई पवार व वक्फ सचिवालय आणि प्रशासनासमोर आता या मागण्यांबर स्पष्ट भूमिका घेण्याचे आव्हान आहे. वेळेत स्पष्ट भूमिका घेण्याचे हि आव्हान आहे. तीन वर्ष शासनाने या कडे दुर्लक्ष केल्याने वक्फ मंडळातील मनमानी कारभाराला चालना मिळाली यात काही शंका नाही .
२०२३ पासून २०२६ पर्यंत किती व कोणते ठराव मंजूर झाले, कोणते निर्णय घेण्यात आले आणि त्यावर पुढील प्रशासकीय कार्यवाही काय झाली, याची अधिकृत माहिती वक्फच्या संकेतस्थळावर सार्वजनिक करण्याची मागणी होत आहे. बैठकीचे मिनिट्स सार्वजनिक/प्रसिद्ध करण्यास विलंब का होत आहे आणि त्यामागे नेमके कारण काय? असा गंभीर प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे. वक्फ मंडळाच्या बैठकीत काही निर्णय घाईघाईने घेण्यात आले आहे का, निर्णय प्रक्रियेत आवश्यक नियमांचे पालन झाले का आणि संबंधित निर्णयांमुळे वक्फाच्या हितावर परिणाम होण्याची शक्यता आहे का, याची तपासणी करण्याची हि मागणी शासन आणि प्रशासनाकडे करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या कारभारात पारदर्शकता असल्याचे बोलले जात आहे. मात्र सध्या वक्फ मंडळाने मोठ्या प्रमाणावर काही ट्रस्ट व संस्थांना कायद्याच्या पलीकडे जाऊन नियमांचे व वक्फ कायदा व अधिनियमांविरुद्ध मनमानी पद्धतीनी लीजडीड/ भाडेपट्टा करार आदेश आणि ना-हरकत प्रमाणपत्रे गुप्तरित्या जरी केल्याची माहिती आहे. वक्फ मंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त हे तीन वर्षात सार्वजनिक करण्यात आले नाही, बैठकीचे ठराव व मंजूर प्रस्ताव कायम करण्यात आले नसल्याने व प्रसिद्ध करण्यात आले नाही या कारणाने कायदा व नियमाने बेकायदेशीर ठरविले जाऊ शकते म्हणून २०२३ नंतरचे मंजूर ठराव शासनाने अवैध घोषित करावे व इतिवृत्त दडपणाऱ्यांना निलंबित करून शिस्तभंगाची कारवाही करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.उपमुख्यमंत्री तथा औकाफ मंत्री व औकाफ सचिवालय काय भूमिका मांडतील व काय कारवाही करतील याकडे आता लक्ष लागले आहे.





प्रतिक्रिया द्या