trending_up TRENDING:

कामगारांना खोदकामात सापडले ९९ कोटी रुपये किमतीचे सोने; खजिन्यावर नेमका कोणाचा हक्क?

खऱ्या मालकाचा शोध सुरू...मजुरांना मिळणार सोन्यात वाटा?

person
कामगारांना खोदकामात सापडले ९९ कोटी रुपये किमतीचे सोने; खजिन्यावर नेमका कोणाचा हक्क?

 बेल्जियमच्या  पूर्व फ्लँडर्स भागात एका घराच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना मजुरांना भिंतीमध्ये लपवून ठेवलेला सोन्याचा मोठा खजिना सापडला आहे. मजूर घरामध्ये नवीन सीवर पाइप टाकण्यासाठी खोदकाम करत होते. त्यावेळी तळघराच्या भिंतींमध्ये लपवून ठेवलेले हे सोने त्यांच्या निदर्शनास आले.या खजिन्यामध्ये सोन्याच्या विटांसह मोठ्या प्रमाणात सोन्याची नाणी असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, या सोन्याची किंमत सुमारे ९ मिलियन युरो(९९ कोटी रुपये) असल्याचे सांगितले जात आहे.


खजिना सापडल्यानंतर आता सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे या सोन्याचा खरा मालक कोण? पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, घराची संपूर्ण झडती घेण्यात आली आहे. तसे, सापडलेले सर्व सोने सध्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. तसेच, पोलिसांनी नागरिकांना घटनास्थळी जाऊन स्वतःहून सोने शोधण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहनही केले आहे. बेल्जियमच्या सरकारी चॅनेल VRTशी बोलताना मजुरांनी सांगितले की, सुरुवातीला भिंतीमध्ये सापडलेली नाणी साधी खोटी असल्याचे त्याला वाटले होते. मात्र, जेव्हा आम्हाला सोन्याची एक वीट दिसली, तेव्हा त्यांना हे प्रकरण खूप मोठे असल्याची कल्पना आली. त्यानंतर आम्ही तातडीने कोणताही धोका न पत्करता तातडीने पोलिसांना माहिती दिली. साइट मॅनेजर मारियोने सांगितले की, एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने स्वतःकडे ठेवणे शक्यच नव्हते. तसे केल्यास ते चोरी ठरले असते. त्यामुळे पोलिसांना माहिती देण्याचा निर्णय घेण्यात आला.

घर सध्या चॅरिटी संस्थेच्या ताब्यातपोलिसांनीही हा खजिना योग्य व्यक्ती किंवा संस्थेपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांनी आपल्या फेसबुक प्रोफाइलचा फोटोही सोन्याच्या नाण्याच्या प्रतिमेने बदलला आहे.

खऱ्या मालकाचा शोध सुरू...

आता या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सोन्याचा खरा मालक कोण? बेल्जियमच्या कायद्यानुसार, या खजिन्याचा मूळ मालक समोर येऊन त्यावर दावा करण्यासाठी ५ वर्षांचा म्हणजेच १,८२३ दिवसांचा कालावधी आहे. सध्या तपास यंत्रणेला या सोन्याचा मूळ मालक कोण आहे, याचा शोध लागलेला नाही. त्यामुळे पुढील काही वर्षे या प्रकरणात महत्त्वाची ठरणार आहेत.

ज्या घरातून हा सोन्याचा खजिना सापडला, ते घर सध्या एका चॅरिटी संस्थेच्या ताब्यात आहे. ही संस्था सुमारे ४७ हजार लोकसंख्या असलेल्या डेंडर्मोंडे शहरातील गरजू नागरिकांना मदत करते. संस्थेचे संचालक गर्ट हिलियर्ट यांनी खजिना सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर आश्चर्य व्यक्त केले. जर कायदेशीर प्रक्रियेनंतर हा खजिना संस्थेला मिळाला, तर त्याचा उपयोग गरजू लोकांच्या मदतीसाठी आणि इतर सामाजिक कामांसाठी करता येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.


SELF
शेअर करा: share Facebook share Twitter share WhatsApp
person

लेखकाबद्दल

Kashaf Khan

Kashaf Khan हे दैनिक लोकनिष्ठचे वार्ताहर आहेत. ते महाराष्ट्राच्या विविध विषयांवर सखोल लेखन करतात.

संबंधित बातम्या

Mark Zuckerberg यांनी खरेदी केला २०० वर्षे जुना कॅसल, विस्तार इतका प्रचंड की किचन ते डायनिंग रुमला जाण्यासाठी लागतो तब्बल इतका वेळ
International

Mark Zuckerberg यांनी खरेदी केला २०० वर्षे जुना कॅसल, विस्तार इतका प्रचंड की किचन ते डायनिंग रुमला जाण्यासाठी लागतो तब्बल इतका वेळ

मार्क झुकरबर्ग यांची ही मालमत्ता यॉगलपासून (Youghal) गाडीने अंदाजे ३० मिनिटांच्या अंतरावर ब्लॅकवॉटर व्हॅलीमध्ये, बॅलिंट्रे हाऊस आणि लिस्मोर कॅसल यांसारख्या इतर अनेक प्रतिष्ठित मालमत्तांच्या जवळ वसलेली आहे.

US-Iran War: होर्मुझवरून ट्रम्प यांनी आपल्याच मित्राला दिली धमकी,’जर मध्ये पडला, तर तुमच्यावरही बॉम्ब टाकू
International

US-Iran War: होर्मुझवरून ट्रम्प यांनी आपल्याच मित्राला दिली धमकी,’जर मध्ये पडला, तर तुमच्यावरही बॉम्ब टाकू

इराणने कोणत्याही स्थिती अण्वस्रे तयार करु नये असे आमचे ध्येय्य आहे असे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले आहे. हे वक्तव्य अशा क्षणी आले आहे जेव्हा चर्चेसाठीचा ६० दिवसांचा अवधी संपला आहे. वॉशिंग्टन आणि तेहराण यांनी ही चर्चा पुढे चालवायची की नाही वा मतभेद मिठवायचे का ? यावर कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

इंडोनेशियात ७.७ रिश्टर तीव्रतेचा भीषण भूकंप! त्सुनामीचा हाय अलर्ट जारी; एकापाठोपाठ बसले जोरदार धक्के
International

इंडोनेशियात ७.७ रिश्टर तीव्रतेचा भीषण भूकंप! त्सुनामीचा हाय अलर्ट जारी; एकापाठोपाठ बसले जोरदार धक्के

शनिवारी पहाटे इंडोनेशियाच्या किनारपट्टीजवळ ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला, याचा केंद्रबिंदू ३५ किलोमीटर खोलीवर होता.

comment प्रतिक्रिया (0)

प्रतिक्रिया द्या