trending_up TRENDING:

2026 चा सर्वात फ्लॉप चित्रपट, ज्याला फ्लॉप म्हणून लोकांनी केलं ब्लॉकबस्टर, आता पाहण्यासाठी उडाली झुंबड

2026 चा सर्वात फ्लॉप चित्रपट, ज्याला लोकांनी फ्लॉप चित्रपट, फ्लॉप चित्रपट म्हणून चर्चा करून ठरलं प्रचंड सुपरहिट. याच चित्रपटाने स्पाइडर-मॅन आणि द ओडिसीला टक्कर.

person
2026 चा सर्वात फ्लॉप चित्रपट, ज्याला फ्लॉप म्हणून लोकांनी केलं ब्लॉकबस्टर, आता पाहण्यासाठी उडाली झुंबड

चीनमधील कमी बजेटचा अॅनिमेटेड चित्रपट ‘निउ लाई’ रिलीजच्या सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर सपशेल फ्लॉप ठरला. मात्र, चित्रपटातील खराब दर्जाच्या अॅनिमेशनची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आणि याच चर्चेमुळे चित्रपटाचे नशीबच बदलले.‘Niu Lai’ या चिनी नावाचा अर्थ ‘द काऊ इज कमिंग’ अर्थात ‘गाय आ ​​रही है’ असा होतो. 86 मिनिटांचा हा चित्रपट चीनमध्ये 5 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. रिलीजच्या पहिल्या 10 दिवसांत या चित्रपटाने सुमारे 1.04 लाख रुपये कमावले होते. रिपोर्ट्सनुसार, सुरुवातीला चीनमध्ये 300 पेक्षाही कमी लोकांनी या चित्रपटाची तिकिटे खरेदी केली होती.मात्र, सोशल मीडियावर चित्रपटाच्या अॅनिमेशनची खिल्ली उडवणाऱ्या पोस्ट आणि व्हिडीओ व्हायरल होऊ लागले. चित्रपटातील खराब कॉम्प्युटर ग्राफिक्स, पात्रांची विचित्र हालचाल, अजब व्हॉइस अॅक्टिंग आणि गोंधळलेली कथा यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या. काहींनी त्याच्या अॅनिमेशनची तुलना विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्टशी केली, तर काहींनी ते AI पेक्षाही खराब असल्याचे म्हटले. अनेकांनी ‘निउ लाई’ला 2026 मधील सर्वात खराब चित्रपटांपैकी एक असेही संबोधले.

फ्लॉप-फ्लॉप म्हणून चित्रपट ठरला सुपरहिट

पण या टीकेचाच चित्रपटाला अनपेक्षित फायदा झाला. सोशल मीडियावरील चर्चेमुळे ‘निउ लाई’ची उत्सुकता वाढली आणि लोक हा चित्रपट स्वतः पाहण्यासाठी थिएटरमध्ये जाऊ लागले. परिणामी, चित्रपटाच्या कमाईत अचानक मोठी वाढ झाली.

चीनी तिकीट विक्री प्लॅटफॉर्म माओयानच्या माहितीनुसार, ‘निउ लाई’ने आतापर्यंत सुमारे 20 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. त्यामुळे चीनच्या बॉक्स ऑफिसवर या छोट्या बजेटच्या चित्रपटाची तुलना आता क्रिस्टोफर नोलन यांच्या ‘द ओडिसी’ आणि ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’सारख्या मोठ्या चित्रपटांशी केली जात आहे.

चित्रपट पूर्ण होण्यासाठी लागली पाच वर्षे

या चित्रपटाच्या निर्मितीची कहाणीही तितकीच अनोखी आहे. ‘निउ लाई’ हा चित्रपट शिन युमेंग आणि सन लिफांग या केवळ दोन व्यक्तींनी पाच वर्षांहून अधिक काळात तयार केल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, या दोघांनीच चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि व्हॉइस अॅक्टिंगची जबाबदारीही सांभाळली आहे.

‘निउ लाई’ची कथा एका नवजात बछड्याभोवती फिरते. या बछड्याचे एका स्कायलार्क पक्ष्यासोबतचे नाते आणि त्यांच्यातील भावनिक प्रवास चित्रपटात दाखवण्यात आला आहे. त्यांच्या नात्याला एका दृश्याच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे.

SELF
शेअर करा: share Facebook share Twitter share WhatsApp
person

लेखकाबद्दल

Kashaf Khan

Kashaf Khan हे दैनिक लोकनिष्ठचे वार्ताहर आहेत. ते महाराष्ट्राच्या विविध विषयांवर सखोल लेखन करतात.

संबंधित बातम्या

Govinda-Sunita Ahuja Controversy : लोकांना फक्त फुटेज… गोविंदा-सुनिता कॉन्ट्रोव्हर्सीवर अखेर भाचीने सोडलं मौन
Entertainment

Govinda-Sunita Ahuja Controversy : लोकांना फक्त फुटेज… गोविंदा-सुनिता कॉन्ट्रोव्हर्सीवर अखेर भाचीने सोडलं मौन

गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक आयुष्यातील वाद, घटस्फोटाचे प्रकरण आणि परस्त्रीच्या आरोपांमुळे सध्या चर्चांना उधाण आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे प्रकरण सुरू असून, आता कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंगने यावर मौन सोडलं. आरतीने सार्वजनिकरित्या बोलण्यास नकार दिला असला तरी, कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केलं.

Abhijeet Dipke : अमेरिका सोडून भारतात का आले अभिजीत दिपके, त्यांच्यावर कोणत्या बड्या व्यक्ती प्रभाव? स्वतःच केला मोठा खुलासा?
Entertainment

Abhijeet Dipke : अमेरिका सोडून भारतात का आले अभिजीत दिपके, त्यांच्यावर कोणत्या बड्या व्यक्ती प्रभाव? स्वतःच केला मोठा खुलासा?

Abhijeet Dipke : अमेरिकेत शिक्षण घेवून भारतात आलेले अभिजीत दिपके यांनी 'कॉकरोच जनता पार्टी' (Cockroach Janta Party) ची स्थापना केली. पण ते भारतात का आले आणि त्यांच्यावर कोणात्या बड्या व्यक्ती प्रभाव? याचा खुलासा स्वतः दिपके यांनी केला आहे.

comment प्रतिक्रिया (0)

प्रतिक्रिया द्या