trending_up TRENDING:

Govinda-Sunita Ahuja Controversy : लोकांना फक्त फुटेज… गोविंदा-सुनिता कॉन्ट्रोव्हर्सीवर अखेर भाचीने सोडलं मौन

गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक आयुष्यातील वाद, घटस्फोटाचे प्रकरण आणि परस्त्रीच्या आरोपांमुळे सध्या चर्चांना उधाण आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे प्रकरण सुरू असून, आता कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंगने यावर मौन सोडलं. आरतीने सार्वजनिकरित्या बोलण्यास नकार दिला असला तरी, कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केलं.

person
Govinda-Sunita Ahuja Controversy : लोकांना फक्त फुटेज… गोविंदा-सुनिता कॉन्ट्रोव्हर्सीवर अखेर भाचीने सोडलं मौन

अभिनेता गोविंदा (Govinda) आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वादळ, त्यांच्या कुरबुरी या समोर आल्या. त्यांच्या लग्नाबाबत, आयुष्याबाबत बरीच चर्चा सुरू झाली. सार्वजनिक स्तारवर हा वाद आल्यावर प्रकरण बरंच चिघळलं. यावर काही दिवसांपूर्वी गोविंदाची सून , कृष्णा अभिषेकची पत्नी , अभिनेत्री काश्मिरा शाहने क्रिप्टीक पोस्ट केली होती. तर आता गोविंदाची भाच्ची, कृष्णाची बहीण, अभिनेत्री आरती सिंगने देखील या विषयावर आपलं मौन सोडत पहिल्यांदाच प्रतिक्रिया गिली आहे. गोविदाची पत्नी सुनीता ही नुकतीच त्यांचा नुलगा यशसोबत फॅमिली कोर्टात दिसली होती. गेल्या दीड-दोन वर्षांपासून गोविंदा आणि सुनीता यांच्यात बरेच मतभेद दिसून आले. सुनीत यांनी गोविंदावर अनेक आरोप केले, तसेच सह-अभिनेत्री कोमल राणीशी गोविंदा लग्न करणार असल्याचाही दावा सुनीताने केला होता.

मामा-मामीच्या वादावर पहिल्यांदाच बोलली आरती सिंह

गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर नुकताच अभिनेत्री आरती सिंहला प्रश्न विचारण्यात आला. मात्र या कौटुंबिक विषयावर मी मीडियासमोर काहीही भाष्य करणार नाही, असं तिने स्पष्ट केलं. मी आधी माझ्या कुटुंबीयांशी याबाबत चर्चा करेन, असं ती म्हणाली. तसेच गोविंदा-सुनीत यांच्या वादात जे फुटेज घेण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावरही तिने टीकास्त्र सोडलं.

आरती म्हणाली, ‘माझ्या मनात जे काही आहे, ते मी रात्री (भाऊ) कृष्णाला फोन करून सांगेन. यशशी, टीनाशी आणि माझ्या आईशीही बोलेन. सुनीता मामीशीदेखील बोलेन. माझ्या भावना मी माझ्या कुटुंबीयांसोबत शेअर करेन. मात्र, त्या सगळ्या जगाला सांगण्याची मला गरज वाटत नाही’ असं तिने सुनावलं.

हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे

माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींच्या वैयक्तिक प्रकरणांमध्ये मी हस्तक्षेप करत नाही, असं तिने सांगितलं. एवढंच नव्हे तर या विषयावर केवळ फुटेज मिळवण्यासाठी प्रश्न विचारणाऱ्यांवरही आरतीने अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

सुनीताने 2 वर्षांपूर्वी घटस्फोटासाठी केला होता अर्ज

सुनीता आहुजाने जवळपास दोन वर्षांपूर्वी गोविंदापासून घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तेव्हापासून हे प्रकरण सातत्याने चर्चेत आहे. अनेक मुलाखतींमध्ये सुनीताने गोविंदाच्या कथित विश्वासघाताबद्दल आणि विवाहबाह्य संबंधांबाबत भाष्य केलं होतं. तसेच काही महिन्यांपूर्वी तिने गोविंदाचे कोमल नावाच्या मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याचा आरोप केला होता. नुकताच गोविंदा हा कोमलसोबत दिसल्यानंतर सुनीताने त्याच्यावर निशाणा साधला. यानंतर गोविंदानेही सुनीताला सडेतोड उत्तर देत मर्यादेत राहण्याचा इशारा दिला होता.

एवढंच नव्हे तर याचदरम्यान, सुनीताने केलेल्या आणखी एका दाव्यामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं. गोविंदा आणि कोमल लग्न करण्याच्या तयारीत होते, असा दावा सुनीताने केला. याच कारणामुळे तिने गोविंदाविरोधातील घटस्फोटाचा खटला मागे घेतल्याचंही सांगण्यात येत आहे.

SELF
शेअर करा: share Facebook share Twitter share WhatsApp
person

लेखकाबद्दल

Kashaf Khan

Kashaf Khan हे दैनिक लोकनिष्ठचे वार्ताहर आहेत. ते महाराष्ट्राच्या विविध विषयांवर सखोल लेखन करतात.

संबंधित बातम्या

Abhijeet Dipke : अमेरिका सोडून भारतात का आले अभिजीत दिपके, त्यांच्यावर कोणत्या बड्या व्यक्ती प्रभाव? स्वतःच केला मोठा खुलासा?
Entertainment

Abhijeet Dipke : अमेरिका सोडून भारतात का आले अभिजीत दिपके, त्यांच्यावर कोणत्या बड्या व्यक्ती प्रभाव? स्वतःच केला मोठा खुलासा?

Abhijeet Dipke : अमेरिकेत शिक्षण घेवून भारतात आलेले अभिजीत दिपके यांनी 'कॉकरोच जनता पार्टी' (Cockroach Janta Party) ची स्थापना केली. पण ते भारतात का आले आणि त्यांच्यावर कोणात्या बड्या व्यक्ती प्रभाव? याचा खुलासा स्वतः दिपके यांनी केला आहे.

2026 चा सर्वात फ्लॉप चित्रपट, ज्याला फ्लॉप म्हणून लोकांनी केलं ब्लॉकबस्टर, आता पाहण्यासाठी उडाली झुंबड
Entertainment

2026 चा सर्वात फ्लॉप चित्रपट, ज्याला फ्लॉप म्हणून लोकांनी केलं ब्लॉकबस्टर, आता पाहण्यासाठी उडाली झुंबड

2026 चा सर्वात फ्लॉप चित्रपट, ज्याला लोकांनी फ्लॉप चित्रपट, फ्लॉप चित्रपट म्हणून चर्चा करून ठरलं प्रचंड सुपरहिट. याच चित्रपटाने स्पाइडर-मॅन आणि द ओडिसीला टक्कर.

comment प्रतिक्रिया (0)

प्रतिक्रिया द्या