Demo
trending_up TRENDING:

शहनाज गिल लग्नाला जाणं टाळते कारण…; अभिनेत्रीने प्रेमाबद्दल व्यक्त केलं मत, म्हणाली, “मी जे काही केलं…”

Shehnaaz Gill Marriage Relationship : शहनाज गिल लग्न करण्याबाबत आणि प्रेमाबद्दल काय म्हणाली?

person
शहनाज गिल लग्नाला जाणं टाळते कारण…; अभिनेत्रीने प्रेमाबद्दल व्यक्त केलं मत, म्हणाली, “मी जे काही केलं…”

Shehnaaz Gill Marriage Relationship : ‘बिग बॉस’ हिंदीमधून प्रचंड लोकप्रियता मिळवून सिनेविश्वामध्ये स्वतंत्र ओळख निर्माण करणारी अभिनेत्री शहनाज गिल ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये अनेकदा चर्चेमध्ये असते. तिचे अनेकदा राघव जुयालसह नाव जोडण्यात आले होते, मात्र ते फक्त चांगले मित्र असल्याचा खुलासा शहनाजने केला आहे. यानंतर आता शहनाज गिलने तिच्यासाठी प्रेम म्हणजे काय आहे आणि लग्नाबद्दल तिचे मत व्यक्त केले आहे.

‘इश्कनामा’फेम शहनाज गिलने ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिचे प्रेम आणि लग्न याबाबत विचार मांडले आहेत. यावेळी शहनाजने तिचे नातेवाईक तिला लग्नासाठी स्थळं सुचवत असल्याने ती दुसऱ्यांच्या लग्नांमध्ये जाण्याचे टाळत असल्याचेदेखील सांगितले. शहनाजला प्रेम म्हणजे काय? असा प्रश्न विचारल्यावर ती म्हणाली, “माझ्यासाठी प्रेमाची व्याख्या खूप वेगळी आहे. प्रेम म्हणजे एखाद्याला वेळ देणं आहे. आपण एकमेकांना, घरच्यांना किंवा मित्र-मैत्रिणींना जो वेळ देतो ते प्रेम आहे. आपण समोरच्या व्यक्तीला त्याची स्वतःची स्पेस देणं हेही माझ्यासाठी प्रेमच आहे.”

आता माझा फक्त स्वतःवर विश्वास – शहनाज

पुढे शहनाज म्हणाली, “ओल्ड स्कूल प्रेमाचा अनुभव मला तरी कधीच आलेला नाही, त्यामुळे ‘ओल्ड स्कूल’ प्रेम म्हणजे नेमकं काय, हे मला माहीत नाही. मी आयुष्यात जे काही केलं, ते मी माझ्यासाठी चांगलं केलं, पण आता माझा फक्त स्वतःवर विश्वास आहे.

SELF
शेअर करा: share Facebook share Twitter share WhatsApp
person

लेखकाबद्दल

Dainik Loknisht

Dainik Loknisht हे दैनिक लोकनिष्ठचे वार्ताहर आहेत. ते महाराष्ट्राच्या विविध विषयांवर सखोल लेखन करतात.

संबंधित बातम्या

“आता कोणालातरी डेट कर अन्…”; सलमान खानचा घटस्फोटित सोहेल खानला सल्ला, म्हणाला…
Entertainment

“आता कोणालातरी डेट कर अन्…”; सलमान खानचा घटस्फोटित सोहेल खानला सल्ला, म्हणाला…

Salman Khan Alliance : सलमान खानने सोहेल खानला आयुष्यात पुढे जाण्यासाठी दिला महत्त्वपूर्ण सल्ला

बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा पुण्यात; मराठी चित्रपटात काम करणार
Entertainment

बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा पुण्यात; मराठी चित्रपटात काम करणार

बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनास पुण्याच्या दौऱ्यावर आल्या असून त्यांनी एका मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

comment प्रतिक्रिया (0)

प्रतिक्रिया द्या