trending_up TRENDING:

दर्गाह हाजी मलंग बाबा हिंदू आणि मुस्लिम धर्मांच्या एकतेचे एक उत्तम उदाहरण

हाजी मलंगची मजार की मच्छिंद्रनाथांची समाधी खटला संपला का...?

person
दर्गाह हाजी मलंग बाबा हिंदू आणि मुस्लिम धर्मांच्या एकतेचे एक उत्तम उदाहरण

कल्याण - ( दैनिक लोकनिष्ठ ) कल्याणमधील हाजी मलंग दर्गाह हे केवळ एक पवित्र स्थळ नसून, तो एक श्रद्धेचा प्रवास आहे. डोंगरावरील चढाई, प्रार्थनेचा नाद आणि थंड पर्वतीय हवा, हे सर्व मिळून शांतता आणि पवित्रतेची भावना निर्माण करतात.तुम्ही भक्तीसाठी किंवा साहसासाठी भेट द्या, हि दर्गाह प्रत्येक हृदयावर एक कायमस्वरूपी छाप सोडतो. हाजी मलंग दर्गाह हा प्रेम, श्रद्धा आणि सेवेच्या माध्यमातून स्वर्ग आणि पृथ्वीला जोडणाऱ्या सुफी अध्यात्मिकतेचे एक तेजस्वी प्रतीक म्हणून उभा आहे.हजरत अब्दुल रहमान शाह उर्फ ​​हाजी मलंग बाबा यांची हि दर्गाह आहेत. हाजी मलंग बाबांची दर्गाह ही ८०० वर्षे जुन्या असल्याचे सांगण्यात येत आहे .


अंबरनाथ जवळील हजरत अब्दुल रहमान शाह उर्फ ​​हाजी मलंग बाबा यांच्या दर्गाहच्या मालकी हक्काबाबत आणि मच्छिंद्रनाथ मंदिर म्हणून असलेल्या धार्मिक ओळखीबाबत, देशातील एक महत्त्वपूर्ण कायदेशीर खटला, जो ४० वर्षांहून अधिक काळ सुरू होता,अखेर निकाल निघाला असल्याची माहिती समोर अली आहे. ठाणे जिल्हा न्यायालयाने १९८२ पासून प्रलंबित असलेला दिवाणी दावा (दिवाणी दावा क्र. १/१९८२) आणि त्यासंबंधित सर्व दावे व याचिका फेटाळून लावल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.जिल्हा न्यायालयाने असा निर्णय दिला की, मूळ दावेदारांच्या कायदेशीर वारसांनी किंवा प्रतिनिधींनी त्यांच्या निधनानंतर कायदेशीर मुदतीत खटल्याचा पाठपुरावा केला नाही आणि अनेक वर्षांच्या विलंबासाठी कोणतेही स्वीकारार्ह कायदेशीर कारण सादर केले गेले नाही. त्यामुळे, हा खटला कायदेशीररित्या गोठवण्यात आला आहे. न्यायालयाने असेही म्हटले आहे की, हा खटला पुन्हा सुरू करण्याचे सर्व प्रयत्न अस्वीकार्य आहेत.या निर्णयामुळे,सुमारे ४४ वर्षे सुरू असलेली ही ऐतिहासिक कायदेशीर लढाई न्यायालयीन स्तरावर निकालात निघाली आहे.


मिळालेली माहिती अशी कि ,मोहन आनंद गोखले आणि पांडुरंग मारुती साळुंखे यांनी १९८२ मध्ये हाजी मलंग बाबांचे दर्गाह ,मंदिर हे मच्छिंद्रनाथांची समाधी (कबर) असल्याचा दावा करत,ठाणे जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता की, ती जागा मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ आणि हिंदू व मठ पंथांशी संबंधित इतर नाथांचे समाधी मंदिर आहे. ते हाजी मलंग बाबांचे दर्गाह नव्हते. अनेक वर्षे चाललेल्या या कायदेशीर लढाई दरम्यान दोन्ही दावेदारांचा मृत्यू झाला.वादी क्र.१ मोहन गोखले यांचे जुलै १९९८ मध्ये निधन झाले, तर दुसरे दावेदार पांडुरंग साळुंखे यांचे मे २००८ मध्ये निधन झाले. दिवाणी कायद्यानुसार, पुढील कार्यवाही करण्यासाठी कायदेशीर वारसांनी वादीच्या मृत्यूनंतर ९० दिवसांच्या आत न्यायालयात हजर राहणे आवश्यक आहे. २००८ मध्ये दुसऱ्या दावेदाराच्या मृत्यूनंतर, आठ वर्षे कोणताही प्रतिनिधी न्यायालयासमोर हजर झाला नाही. 


मिळालेल्या माहितीनुसार मुंबई उच्च न्यायालयाने २०१७ मध्ये एका रिट याचिकेवर निर्णय देताना, जिल्हा न्यायालयात खटला गोठवण्यात आल्यामुळे त्या रिट याचिकेला कायदेशीर आधार नाही, असा निकाल दिला होता. त्यामुळे, १९८२ पासून सुरू असलेला हा ऐतिहासिक खटला आता संपुष्टात येत असल्याचे दिसते.

यापूर्वीही १९६८ मध्ये, गोपाळ, कृष्णाजी केतकर विरुद्ध मोहम्मद हाजी लतीफ आणि इतरांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने हाजी मलंग यांना दर्गाह म्हणून घोषित केले होते असे दिसून येते. यासर्वांमध्ये ८०० वर्ष जुन्या दर्गाह बाबत महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची भूमिका संशयास्पद राहिली .सुरुवातीपासून वक्फ मंडळाने आणि प्रशासनाने चुप्पी साधले, अंधे, बहरे च्या भूमिका घेत बघत राहिले. अश्या वक्फ मंडळ आणि प्रशासनाकडून वक्फ मिळकतीची संरक्षणाची अपेक्षा कशी करता येईल .वक्फ मंडळात अधिकाऱ्यांचे मनमानी कारभार व भ्रष्ट्राचाराला वरून ते खालपर्यंत वरदहस्त असल्याने शासनाचा या विभागावर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. शासनाने वक्फ मंडळाच्या गैरव्यवहाराकडे लक्ष केंद्रित केल्यास कोट्यवधीचे घोटाळे उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वक्फच्या फाईलींचे मुख्य लेखापरीक्षक कडून परीक्षण झाल्यास तर अनेक स्वच्छाधारी तुरुंगात वारी होण्यास वेळ लागणार नाहीत .


 हजरत अब्दुल रहमान शाह उर्फ हाजी मलंग बाबा यांचे दर्गाह ८०० वर्षांपासून अस्तित्वात असून ते महाराष्ट्र वक्फ बोर्डाकडे विधिवत नोंदणीकृत आहे असे हि सांगितले जाते. काही लोकांनी बाबांचा दर्गा हा मच्छिंद्रनाथांची कबर असल्याचा दावा करून कायदेशीर अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु दर्गाह ट्रस्टकडे असंख्य कायदेशीर आणि ऐतिहासिक कागदपत्रे आहेत, जी या वस्तुस्थितीची पुष्टी करतात की हे पवित्र स्थान खरोखरच हाजी मलंग बाबा यांचेच आहे असे म्हटले जाते. 

हाजी मलंग दर्गाह हे भारतातील मुंबईजवळ कल्याणच्या डोंगरांमध्ये वसलेले एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र आहे .हे हाजी मलंग बाबा नावाच्या एका सुफी संताला समर्पित आहे ,जे १२ व्या शतकात तिथे राहत होते असे मानले जाते.या तीर्थक्षेत्रात मुस्लिम आणि हिंदूंसह विविध धर्मांचे मोठ्या संख्येने भाविक येतात. हे ठिकाण विशेषतः फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होणाऱ्या वार्षिक उर्स उत्सवासाठी प्रसिद्ध आहे, ज्यासाठी हजारो यात्रेकरू येतात.


नेत्यांनी दर्ग्याच्या वादावर बोलणे टाळावे श्रध्दाळूंचे म्हणणे -

हजरत हाजी मलंग बाबा दर्गाह ट्रस्टचे सदस्य यांनी म्हटले होते की, हे स्थळ मंदिर आहे की दर्गाह, यावर नेत्यांनी बोलणे टाळावे, हा ट्रस्ट सर्वधर्मीय आणि सर्वसमावेशक आहे, परंतु बॉम्बे गॅझेटियरमध्ये या स्थळाचा उल्लेख दर्गाह म्हणून करण्यात आला होता, असेही त्यांनी नमूद केले होते .या टेकडीवर शतकानुशतके हिंदू आणि मुस्लिम सलोख्याने एकत्र राहत आले आहेत," असे लोक म्हणतात. "आम्ही एकत्र सण साजरे करतो आणि गरजेच्या वेळी एकमेकांना आधार देतो."दुसरे कोणी आपल्या पाठीशी उभे राहत नाही - मग आपण आपापसात का भांडावे असे लोकांचे म्हणणे आहे.

SELF
शेअर करा: share Facebook share Twitter share WhatsApp
person

लेखकाबद्दल

Yunus Khan

Yunus Khan हे दैनिक लोकनिष्ठचे वार्ताहर आहेत. ते महाराष्ट्राच्या विविध विषयांवर सखोल लेखन करतात.

संबंधित बातम्या

comment प्रतिक्रिया (0)

प्रतिक्रिया द्या