धाराशिव (दैनिक लोकनिष्ठ) - महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ हे एक विश्वासू सार्वजनिक संस्था आहे. वक्फ कायद्यानुसार वक्फ बोर्डाची प्रमुख जवाबदारी म्हणजे वक्फ मालमत्तांचे संरक्षण करणे, बेकायदेशीर अतिक्रमण हटविणे व कायदेशीर कारवाही करणे हे आहेत परंतु मौजे कॉड ता. जि.धाराशिव (उस्मानाबाद) येथील दर्गाह हजरत मलंगशाह वाली च्या दर्गाह व इनाम जमिनीवर अतिक्रमण करून अवैध बांधकाम करण्याचा प्रत्यन केले जात असल्याची तक्रार दर्गाह चे सेवाकार यांनी जिल्हाधिकारी धाराशिव व जिल्हा वक्फ अधिकारी धाराशिव यांना सादर केलेले आहे.
दर्गाह इनाम जमिनीवर होत असलेल्या अतिक्रमणाबाबत धाराशिवचे जिल्हाधिकारी यांनी तक्रारीची दाखल घेत कार्रवाहीचे आदेश दिल्या मात्र जिल्हा वक्फ अधिकारी सय्यद आमेर खैसर पटेल यांनी तक्रारीकडे सर्रास दुर्लक्ष करून कुठलीच कारवाही केले नाही ज्यामुळे जिल्हा वक्फ अधिकारी यांच्या भूमिकेवर संशय निर्माण होत आहे आणि नागरिकांकडून जिल्हा वक्फ अधिकारीच्या कामावर नाराजगी व्यक्त केली जात आहे. याबाबत दर्गाह मलंगशाह वली जमिनीवर अतिक्रमण सांगा कसून चौकशी वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी फय्याज खान यांना प्रकरणी माहिती देताच त्यांनी तात्काळ प्रकरणाची माहिती घेतली व जिल्हा वक्फ अधिकाऱ्याला कार्यवाहीचे निर्देश दिल्या आहे. मौजे कॉड ता. जि.धाराशिव (उस्मानाबाद) येथील दर्गाह हजरत मलंगशाह वाली च्या वक्फ जमिनीवर अतिक्रमण करून बेकायदा बांधकाम करण्यात येत आहे. वक्फ कायदा व नियमांचे उल्लंघन होऊनही वक्फ प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष यासंबंधी वारंवार आवाज उठवूनही काहीच कारवाई होत नसल्यामुळे येथील नागरिक व दर्गाह मध्ये येणाऱ्या भाविकांकडून नाराजगी व्यक्त करीत आहेत. दर्गाह हजरत मलंगशाह वालीच्या दर्गाह जमिनीवर होत असलेल्या अतिक्रमण बाबतच्या तक्रार धाराशिवचे जिल्हाधिकारी यांनी गांभीर्यानी घेऊन तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिल्या आणि जिल्हा वक्फ अधिकारी यांना हि कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशित केल्या होत्या. जिल्हा वक्फ अधिकारी यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन कारवाही न करता, नागरिकांना समाधानी उत्तर न देता माझ्या मर्जीनुसार मी काम करेल माझी कुठे तक्रार करायची करा असे म्हटल्याचे त्रास नागरिकांनी सांगितले आहे. मनमानीपध्द्तीने करणाऱ्या अधिकाऱ्याची वक्फ बोर्डाला गरज का वाटते? कोणाच्या आशीर्वादाने हा अधिकारी उडू लागला.
भ्रष्ट्राचार या विभागात वाढल्याने अधिकाऱ्यांना माज आली असल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठांनी याप्रकरणी तात्काळ दाखल घ्यावी व जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाचे पालन न करणाऱ्या या जिल्हा वक्फ अधिकारावर कारवाही करावी अशी मागणी नागरिकांकडून केले जात आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी फप्याज खान यांनी प्रकरणाची दखल घेतल्याने दर्गाह समिती व भाविकांनी त्यांचे आभार मानले आणि वक्फ व दर्गाहच्या जमिनीवरील अवैध बांधकाम अतिक्रमण काढण्याबाबत हि कारवाही करावी अशी मागणी केले जात आहे.





प्रतिक्रिया द्या